भारतीय खेळाडूंचा अतिशाहणपणा, गरज नसताना मिरवले, आता कोरोनाने जिरवली!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर इंग्लंड विरुद्धचे कसोटी सामने सुरु होण्यास बराच वेळ असल्याने भारतीय क्रिकेटपटू फॅमिली सुट्टी एन्जॉय करत होते. याचवेळी संघातील काहींना कोरोनाची बाधा झाली असणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

भारतीय खेळाडूंचा अतिशाहणपणा, गरज नसताना मिरवले, आता कोरोनाने जिरवली!
भारतीय संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 2:35 PM

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर (Engaland Tour) असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) दोन खेळाडूमना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आल्याने संघ प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड क्रिकेट संघातील (England Cricket Team) खेळाडूंसह 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता भारताच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंना दिलेल्या सूचनांचे उल्लघंन केल्यामुळे असे झाले आहे का? अशा चर्चांना सध्या उधान येत आहे.

पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार माहितीनुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यामनी युकेमधील कोरोना परिस्थितीमुळे खेळाडूंना इमेलद्वारे काही सूचना दिल्या होत्या. ज्यात त्यांनी खेळाडू आणि टीमच्या इतर सदस्यांना युरो चषक 2020 विम्बल्डनसारख्या भव्य स्पर्धांना हजेरी न लावण्याबाबत सतर्क केले होते. पण मागील काही दिवसांत समोर आलेल्या खेळाडूंच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे एक नाही तर अनेक खेळाडूंनी अशाप्रकारे मोठ्या स्पर्धांना हजेरी लावल्याचे समोर आले होते. ज्यात प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश होतो.

यूरो चषकाबपासून विम्बल्डनपर्यंत सर्वत्र भारतीय खेळाडू हजकर

युरो चषकाच्या ग्रुप मॅचेससह सेमी फायनल आणि फायनलही इंग्लंडमध्ये खेळवल्या गेल्या होत्या. यावेळी ऋषभ पंत, हनुमा विहारी सह  जसप्रीत बुमराह वेगवेगळ्या मॅचेसवेळी सामना पाहण्यासाठी गेले होते. तर प्रशिक्षक रवी शास्त्री रविवारी 11 जुलैला विम्बल्डन 2021 चा अंतिम सामना पाहण्यासाठी गेले होते. फिरकीपटू आर आश्विनही विम्बल्डन पाहण्यासाठी गेला होता.

दोन खेळाडूंना कोरोना, प्रकृती स्थिर

दोन्ही खेळाडूंना थंडी वाजणे, घशात खवखवणे, ताप येणे अशा प्रकारची लक्षणे होती. परंतु दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे. पहिल्या खेळाडूची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे तर दुसऱ्या खेळाडूची दुसरी कोरोना टेस्ट 18 जुलै रोजी केली जाणार आहे. मात्र संघातल्या नेमकी कुणाला कोरोनीची लागण झाली याची माहिती अद्याप आणखी समोर आलेली नाही. सध्या संबंधित प्लेयर आयसोलेशनमध्ये आहे. 18 तारखेला त्याचा आयसोलेशन मधील 10 वा दिवस असेल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लगोलग तो भारतीय संघाच्या सोबत सराव करेल.

हे ही वाचा :

भारतीय संघात कोरोनाची एन्ट्री, 2 खेळाडू पॉझिटिव्ह, इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी चिंता वाढल्या!

पाकिस्तानच्या बाबर आजमचा नवा रेकॉर्ड, विराट कोहलीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

(BCCI Jay Shah Warning of not attending Euro 2020 and Wimbeldon not Folllwed by Indian Cricketers result that Players tested Covid Postive)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.