IPL 2024 Auction आधी BCCI चा एक चांगला निर्णय, ‘या’ खेळाडूंचा फायदा
IPL 2024 Auction | भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) IPL 2024 च्या लिलावाआधी काही बदल करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची तयारी पूर्ण झालीय. अनकॅप्डमधून जे कॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनणार त्या खेळाडूंचा फायदा होणार आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढच्या सीजनसाठी मंगळवारी लिलाव होईल. या लिलावात पुन्हा एकदा पाण्यासारखा पैसा खर्च होण्याचा अंदाज आहे. आयपीएलमुळे क्रिकेटसचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय. या लीगमुळे क्रिकेटपटू कोट्यधीश बनले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसताही क्रिकेटर्स कोट्यधीश बनले. त्यामुळे सर्वच क्रिकेटर्सना आयपीएल लिलावाची प्रतिक्षा असते. या लिलावामुळे क्रिकेटर्सना फायदा होतो. यावेळी बीसीसीआयने क्रिकेटर्सचा आनंद द्विगुणित करण्याचा विचार केलाय. भारताच्या अनकॅप्ड प्लेयर्सना इंसेटि्व देण्याच बीसीसीआयने ठरवलय. क्रिकबजने आपल्या रिपोर्ट्मध्ये ही माहिती दिलीय.
सीजन सुरु होण्याआधी अनकॅप्ड खेळाडूची फी 50 लाखापेक्षा कमी आहे. पण तो खेळाडू दुसरा सीजन सुरु होण्याआधी 5 ते 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळला, तर पुढच्या सीजनसाठी त्या खेळाडूची फी वाढेल. कमीत कमी एक मॅच खेळणाऱ्या खेळाडूची फी 50 लाख रुपये असेल. त्याचवेळी 5-9 मॅच खेळणाऱ्या खेळाडूची फी 75 लाख असेल. खेळाडू 10 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळला तर त्याची फी 1 कोटी रुपये असेल. अनकॅप्ड प्लेयर दोन सीजनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटर बनला, तर त्याची सॅलरी वाढेल.
रोहित-विराटला काय मिळणार?
इंटरनॅशनल क्रिकेट मॅचमध्ये जो प्लेयर देशाच्या प्लेइंग 11 मध्ये असेल, मग फॉर्मेट कुठलाही असो तो कॅप्ड प्लेयर असेल असं बीसीसीआयने सांगितलं. आयसीसीचे असोसिएट मेंबरचे खेळाडू आयपीएलसाठी अनकॅप्डच समजले जातील. या बदलांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या खेळाडूंसाठी काही नाहीय. या प्लेयर्सना फ्रेंचायजीने नेहमीच कोट्यवधी रुपये दिले आहेत. बीसीसीआयने यावेळी सामान्य खेळाडूंचा विचार केलाय.