Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI कडून खेल रत्न पुरस्कारासाठी मिताली राजसह, भारताच्या दिग्गज फिरकीपटूची शिफारस

खेल रत्न पुरस्कारासह अर्जुन पुरस्कारासाठीही तिघा युवा क्रिकेटपटूंची नावे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात आली आहेत.

BCCI कडून खेल रत्न पुरस्कारासाठी मिताली राजसह, भारताच्या दिग्गज फिरकीपटूची शिफारस
मिताली राज
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 1:41 PM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशातील खेळाडूंसाठी सर्वांत मानाचा पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या खेल रत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna Award) भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजसह फिरकीपटू आर. आश्विनच्या नावाची शिफारस केली आहे. यासोबतच अर्जुन पुरस्कारासाठीही (Arjun Award) तिघा युवा क्रिकेटपटूंची नावे बीसीसीआयने सूचवली आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), के एल राहुल ( Kl Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या नावांचा समावेश आहे.29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय खेल दिवसाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. (BCCI Nominates Mithali raj and R Ashwin for Khel Ratna Award And Jasprit Bumrah Shikhar Dhawan Kl Rahul name Given For Arjun Award)

देशांसाठी क्रिडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सम्मान करण्यासाठी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासारखे पुरस्कार दिले जातात. त्यासाठी ठरावीक वेळे केलेल्या अप्रतिम कामगिरीवर क्रिडापटूंची निवड केली आहे. दरम्यान बीसीसीआयने यंदाच्या पुरस्कारांसाठी 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान अप्रतिम कामगिरी केलेल्या खेळाडूंची नावे पुरस्कारासाठी सूचविली आहेत. ANI या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली.

मिताली राज आणि आर. आश्विनची धाकड कामगिरी

महिला क्रिकेटपटू मिताली राजने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 22 वर्षे पूर्ण केली. सचिन तेंडुलकरनंतर इतका काळ खेळलेली ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू आहे. तसेच महिलांच्या एकदिवसीय सामन्यांतही सर्वाधिक धावा मितालीच्याच नावावर आहेत. तर दुसरीकडे आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये मागील बऱ्याच वर्षांपासून भारतीय गोलंदाजीची मदार पेलली आहे. त्याने नुकत्याच 400 विकेट्सा टप्पाही पार केला. तसेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 71 विकेट्स घेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही ठरला. तसेच बुमराह, धवन आणि राहुल यांचीही मागील काही वर्षातील कामगिरी उल्लेखणीय असल्याने अर्जुन पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात आली आहे.

arjuna award nominations

अर्जुन पुरस्कारासाठी नामांकनं

या खेळाडूंनाही नामांकन

खेल आणि युवा कल्याण मंत्रालयद्वारा पुरस्कारांसाठी नामांकन पोहोचवण्याची शेवटची तारीख 5 जुलै आहे. दरम्यान मंत्रालयाने क्रिकेटसह हॉकी इंडियाकडून गोलकीपर पीआर श्रीजेशचे नाव खेल रत्न आणि हरमनप्रीत सिंह, वंदना कटारिया आणि नवज्योत कौर यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. तर भारतीय एथलेटिक्स फेडरेशनने ओडिशा सरकारकडून धावपटू दुती चंदचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी सूचवले आहे.

हे ही वाचा :

एक अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली ‘या’ स्थानावर

Tokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला ‘हा’ योग

Tokyo Olympics : साजन प्रकाशचं घवघवीत यश, ऑलम्पिकसाठी पात्र होणारा पहिला भारतीय जलतरणपटू, वाचा कशी मिळाली पात्रता

(BCCI Nominates Mithali raj and R Ashwin for Khel Ratna Award And Jasprit Bumrah Shikhar Dhawan Kl Rahul name Given For Arjun Award)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.