IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात बदल, 1 2 नाही, तब्बल 11 खेळाडू ‘आऊट’
Border Gavskar Trophy 2024 2025 India Squad : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यंदा पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत एकूण 5 सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यंदा गेल्या दौऱ्यातील 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.
टीम इंडिया नोव्हेंबर महिन्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने 25 ऑक्टोबरला भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने या दौऱ्यासाठी मुख्य संघात 18 खेळाडूंना संधी दिली. तर 3 राखीव खेळाडूंचा समावेश केला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जसप्रीत बुमराह याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडिया अखेरीस 2020-2021 साली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. तेव्हा भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात 2-1 ने मालिका जिंकली होती.
टीम इंडियाचाच गेल्या काही वर्षात बॉर्डर गावसकर ट्रॉफीत दबदबा राहिला आहे. टीम इंडियाने गेल्या दोन्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावस्कर प्रतिष्ठेची मालिका जिंकली आहे. टीम इंडियासाठी 2020-2021 हा दौरा अविस्मरणीय ठरला होता. भारताने मालिकेत पिछाडीवर असताना कमबॅक केलं होतं आणि सीरिज जिंकली होती. त्या मालिकेत अनेक खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात अडकले होते. तर तत्कालीन कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. मात्र त्यानंतरही विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे याने युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड घालत तिरंगा फडकवला होता. तेव्हा मालिका विजयात योगदान देणाऱ्या 11 खेळाडूंचा यंदाच्या संघात समावेश नाही.
11 खेळाडू कोण?
तेव्हा विराट कॅप्टन होता. मात्र वैयक्तिक कारणामुळे विराट 1 सामना खेळून मायदेशी परतला. तेव्हा अजिंक्य रहाणने नेतृत्वाची धुरा सांभाळली. मात्र यंदा अजिंक्य रहाणे नाही. अनुभवी चेतेश्वर पुजारा याचा समावेशही नाही. मयंक अग्रवाल, रिद्धीमान साहा, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, उमेश यादव आणि टी नटराजन यांनाही संधी मिळाली नाही. हे खेळाडू गेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी विजयातील सहभागी खेळाडू होते.
स्टार स्पिनर कुलदीप यादव याचाही समावेश नाही. कुलदीपला दुखापतीमुळे संधी दिली नसल्याचं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तसेच मोहम्मद शमी यालाही दुखापतीमुळे मुकावं लागंल आहे. तर शार्दुल ठाकुर याचाही समावेश करण्यात आलेला नाही. हे तिघेही गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होते.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक
पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.