Rohit Sharma, विराट कोहलीला सिलेक्शन कमिटी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या तीन सिनयर खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. खरंतर या खेळाडूंवर ड्रॉपचा शिक्का बसू नये, यासाठी विश्रांती म्हटलय.

Rohit Sharma, विराट कोहलीला सिलेक्शन कमिटी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत
Virat kohli-Rohit sharmaImage Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 2:44 PM

मुंबई: T20 क्रिकेटमध्ये BCCI ने अमूलाग्र बदल घडवायच ठरवलं आहे. त्या दिशेने बीसीसीआयची वाटचाल सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेत टीम निवडीतून त्या बदलाच प्रतिबिंब दिसून आलय. श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिलीय. हाच ट्रेंड यापुढे कायम दिसू शकतो. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या तीन सिनयर खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. खरंतर या खेळाडूंवर ड्रॉपचा शिक्का बसू नये, यासाठी विश्रांती म्हटलय.

BCCI च्या योजनेमध्ये फिट बसत नाहीत

टीम इंडियाच्या पुढच्या T20 मालिकांचा विचार करता, रोहित शर्मा, विराट कोहली BCCI च्या योजनेमध्ये फिट बसत नाहीत. यामागे मुख्य कारण आहे, त्यांचं वाढत वय. श्रीलंकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी रोहित-विराटचा विचार होणार नाहीय. टीममध्ये त्यांची निवड होणार नाहीय. बीसीसीआय सूत्राच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

BCCI पदाधिकारी काय म्हणाला?

या दोघांशिवाय रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या तिघांचा सुद्धा यापुढे टी 20 सीरीजसाठी बीसीसीआय विचार करणार नाही. “न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजसाठी या खेळाडूंचा विचार होणार नाही. त्यांना आम्ही वगळतोय, असं नाहीय. भविष्याच्या दृष्टीने टीमची बांधणी करावी लागेल, हा त्यामागे विचार आहे. सिलेक्टर्सच याबद्दल अंतिम निर्णय घेतील” असं टॉप बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं. कधीपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरु होणार सीरीज?

श्रीलंकेविरुद्धची सीरीज संपल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 T20 आणि 3 वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. रोहित, विराट न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये खेळतील. पण 27 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी 20 सीरीजचा भाग नसतील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.