भारतात होणार Day-Night कसोटी सामना, BCCI ने केलं प्लानिंग, जाणून घ्या डिटेल्स
वनडे, टी-20 सामन्यांप्रमाणे आता कसोटी सामनेही डे-नाईट (Day-Night Test) आयोजित करण्याचा भारतीय क्रिकेट नियामंक मंडळ (BCCI) विचार करत आहे
मुंबई: वनडे, टी-20 सामन्यांप्रमाणे आता कसोटी सामनेही डे-नाईट (Day-Night Test) आयोजित करण्याचा भारतीय क्रिकेट नियामंक मंडळ (BCCI) विचार करत आहे. बंगळुरुमध्ये श्रीलंकेविरुद्ध डे-नाईट कसोटी आयोजित करण्याचा BCCI चा विचार आहे. कोविडमुळे (Covid-19) सामने आयोजित करण्याच्या स्थळांवर मर्यादा असतानाही, बीसीसीआय श्रीलंकेविरुद्ध डे-नाईट कसोटी मालिका आयोजित करण्याचा विचार करत आहे. कसोटी ऐवजी तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने भारत-श्रीलंका मालिकेला सुरुवात होऊ शकते. पहिली कसोटी बंगळुरुमध्येच खेळवली जाईल का? त्याबद्दल अजून स्पष्टता नाहीय. विराट कोहली येथे त्याच्या कसोटी करीयरमधील 100 वा सामना खेळू शकतो. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी बीसीसीआय श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका धरमशाळा आणि मोहाली येथे खेळवण्याचा विचार करत आहे. टेस्ट बंगळुरुमध्ये आयोजित करण्याचा प्लान आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
काय आहे प्लानिंग
“कसोटी सामने बंगळुरु आणि मोहाली येथे खेळवले जाऊ शकतात. त्याआधी मोहाली, धरमशाळा आणि लखनऊमध्ये टी-20 सामने होतील. टी-20 चे पहिले दोन सामने धरमशाळा येथे तर एक सामना मोहाली येथे खेळवला जाऊ शकतो. लखनऊमध्ये कदाचित टी-20 सामना होणार नाही. दवाचा घटक महत्त्वाचा ठरत असल्यामुळे मोहालीमध्ये कसोटी सामना आयोजित होण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय सध्या देशातील करोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. श्रीलंकेच्या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकातील बदलांबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो” बीसीसीआयमधील सूत्राने ही माहिती दिली.
मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना असेल. विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. या शहरामध्ये त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
BCCI Plans day-night test matches against srilanka