ICC कडून सौरव गांगुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, क्रिकेटशी संबंधित नियम-कायदे बनवणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली याची आयसीसीच्या (ICC) पुरुष क्रिकेट समितीच्या (ICC Men’s Cricket Committee) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ICC कडून सौरव गांगुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, क्रिकेटशी संबंधित नियम-कायदे बनवणार
Sourav Ganguly
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 5:25 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली याची आयसीसीच्या (ICC) पुरुष क्रिकेट समितीच्या (ICC Men’s Cricket Committee) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने बुधवारी ही माहिती दिली. गांगुली त्याचा भारतीय संघातील जुना सहकारी अनिल कुंबळेची जागा घेईल, कुंबेळेने गेली 9 वर्ष ही जबाबदारी पार पाडली होती. क्रिकेट खेळाच्या प्लेईंग कंडीशन आणि खेळाशी संबंधित नियम तसेच कायदे बनवण्याची जबाबदारी क्रिकेट समितीकडे आहे. कुंबळे प्रमुख असतानाच डीआरएसबाबत निर्णय घेण्यात आला होता. मग कोरोनानंतर खेळण्यासंबंधीचे नियमही क्रिकेट समितीनेच बनवले होते. (BCCI president Sourav Ganguly appointed chairman of ICC Cricket Committee)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी एका निवेदनात म्हटले की, “आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरवचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि नंतर प्रशासक म्हणून त्याचा अनुभव आपल्याला भविष्यात क्रिकेटबाबतचे निर्णय घेण्यास मदत करेल. ही जबाबदारी दीर्घकाळ सांभाळल्याबद्दल त्यांनी अनिल कुंबळेचे आभार मानले. यामध्ये नियमितपणे आणि सातत्याने डीआरएस वापरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सुधारणे आणि संशयास्पद गोलंदाजीची अनेक प्रकरणे योग्य प्रकारे हाताळण्याची कामे कुंबळेने केली आहेत.

पुरुषांच्या खेळाप्रमाणे महिला क्रिकेटसाठी प्रथम श्रेणी दर्जा आणि लिस्ट ए पात्रता लागू केली जाईल, असेही बोर्डाने मंजूर केले. ICC महिला समिती पुढे ICC महिला क्रिकेट समिती म्हणून ओळखली जाईल. क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांची आयसीसी महिला समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानसाठी कार्यकारी गट

दरम्यान, अफगाणिस्तानमधील अलीकडच्या राजकीय घडामोडी लक्षात घेऊन तेथील क्रिकेटचा आढावा घेण्यासाठी आयसीसीने एक कार्यकारी समूह गठित केला आहे. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांचाही समावेश आहे. या कार्यकारी समूहाचे नेतृत्व इम्रान ख्वाजा करणार आहेत. त्यात रॉस मॅकॉलम, लॉसन नायडू आणि रमीझ राजा यांचा समावेश आहे. हा समूह येत्या काही महिन्यांत आयसीसी बोर्डाला आपला अहवाल सादर करेल. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर राजकीय वातावरणात झालेल्या बदलामुळे अफगाणिस्तान क्रिकेटबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

तालिबानने महिला क्रिकेटला विरोध केला, त्यामुळे त्यांच्या पुरुष संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकमेव कसोटी पुढे ढकलण्यात आली. “आयसीसी बोर्ड पुरुष आणि महिला क्रिकेटच्या विकासासाठी अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा देण्यास वचनबद्ध आहे,” असे आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सांगितले.

इतर बातम्या

IND vs NZ Head to Head Records in T20Is : टीम इंडिया की न्यूझीलंड, जयपूरमध्ये कोणाचं पारडं जड?

आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 धावांत संघ ऑलआऊट, 7 खेळाडू शून्यावर बाद, वाचा कुठे घडला ‘हा’ अजब सामना

IND vs NZ: रोहित शर्माच्या कर्णधार असताना विराट संघात काय करणार?, रोहितनेच दिलं उत्तर

(BCCI president Sourav Ganguly appointed chairman of ICC Cricket Committee)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.