Ranji Trophy: रणजी करंडक स्पर्धा कधी सुरु होणार? BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने तारखेबद्दल दिली महत्त्वाची माहिती

कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली रणजी करंडक स्पर्धा (Ranji Trophy) दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्पर्धेच्या तारखेसंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Ranji Trophy: रणजी करंडक स्पर्धा कधी सुरु होणार? BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने तारखेबद्दल दिली महत्त्वाची माहिती
Sourav Ganguly
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 12:33 PM

मुंबई: कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली रणजी करंडक स्पर्धा (Ranji Trophy) दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्पर्धेच्या तारखेसंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. बीसीसीआय 13 फेब्रुवारीपासून स्पर्धा सुरु करण्याच्या विचारामध्ये आहे. स्पर्धेचा जो फॉरमॅट आहे, त्यात कुठलाही बदल होणार नसल्याचे बीसीसीआय अध्यक्षांनी सांगितले. सर्व संघांची पाच ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये पाच टीम्स आहेत. प्लेट ग्रुपमध्ये आठ संघ आहेत. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सौरव गांगुलीने रणजी स्पर्धेच्या तारखेबद्दल महिती दिली. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मागच्या महिन्यात बीसीसीआयने रणजी करंडक स्पर्धा पुढे ढकलली होती. रणजीमधून अनेक मोठे खेळाडू तयार झाले आहेत, त्यामुळे भारतात या स्पर्धेच एक वेगळ महत्त्व आहे.

“फेब्रुवारीच्या मध्यावर रणजी करंडक स्पर्धा सुरु करण्याचा विचार आहे. 13 फेब्रुवारीपासून स्पर्धा सुरु होऊ शकते. रणजीचा सध्याचा फॉर्मेट कायम राहणार आहे. दोन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होईल. पहिला टप्पा एक महिन्याचा असेल. IPL 2022 पूर्वी हा टप्पा होईल” अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली.

स्पर्धेच्या स्थळाबद्दल सोमवारपर्यंत होईल निर्णय “27 मार्चपासून IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रणजी करंडक स्पर्धेत नॉकआऊट स्टेजचे सामने जून-जुलैपासून सुरु होतील. कोरोनामुळे कुठली अडचण निर्माण झाली नाही, तर आहे तोच फॉर्मेट कायम राहिलं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आम्ही स्पर्धेसाठी वेन्यू शोधत आहोत. बंगळुरु आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या आम्ही यावर विचार करत असून सोमवारपर्यंत चित्र स्पष्ट होईल” असे सौरव गांगुलीने सांगितले.

नॉकआऊटचे सामने बेंगळुरुमध्ये ? रणजी करंडक स्पर्धा आधी सहा शहरांमध्ये आयोजित केली जाणार होती. यात मुंबई, बंगळुरु, कोलकाता, तिरुअनंतपुरम आणि चेन्नई या शहरांचा समावेश होता. नॉकआऊट सामन्यांच्यावेळी मान्सूनचे दिवस असतील. ‘नॉकआऊटचे सामने बंगळुरुमध्ये खेळवण्याचा प्रयत्न करु’ असे गांगुलीने सांगितले.

Bcci president sourav ganguly says bcci plans to start ranji trophy by mid february

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.