BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींचे विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य, गांगुली म्हणतात…
विराट कोहलीच्या टी-20 कर्णधार पद सोडण्यावर गांगुली यांनी पुन्हा एकदा खुलासा केला आहे. विराट कोहलीला सुरूवातीला टी-20 चे कर्णधार पद सोडू नको असे सांगितले होते, असे गांगुली यांनी म्हटले आहे. असा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे.
मुंबई : भारताचा पूर्व कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुन्हा एकदा विराट कोहलीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियात नेतृत्वबदल झाल्यानंतर काहीशी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. विराट कोहलीच्या टी-20 कर्णधार पद सोडण्यावर गांगुली यांनी पुन्हा एकदा खुलासा केला आहे. विराट कोहलीला सुरूवातीला टी-20 चे कर्णधार पद सोडू नको असे सांगितले होते, असे गांगुली यांनी म्हटले आहे.
कर्णधारबाबत गांगुलींची कोहलीशी चर्चा
विराट कोहली आणि गांगुली यांच्यात सध्या कोण खरं बोलतंय तेही क्रिकेट चाहत्यांना कळेना, अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. अलिकडेच विराट कोहलीने पत्रकार परिषद घेत सौरव गांगुली यांनी टी-20 कर्णधारपदाबाबत दिलेली माहिती चुकीची होती, असे सांगितले, तसेच त्याला कर्णधारपद सोडण्यापासून कोणीही थांबवले नसल्याचेही कोहलीने सांगितले. यानंतर कोहली आणि बीसीसीआय आमनेसामने आले आहेत. सौरव गांगुलींनी यावर काहीही न बोलता, बीसीसीआय हा प्रश्न सोडवेल अशी थोडक्यात प्रतिक्रिया सौरव गांगुली यांनी दिली आहे.
विराट कोहलीच्या भांडखोर वृत्तीवर गांगुलींचे भाष्य
सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या भांडखोर वृत्तीवर भाष्य करत विराट कोहली खूप भांडण करतो असे म्हटले आहे. अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. गांगुलीने मात्र या मुद्द्यावर मीडियाशी थेट कोणताही संवाद साधला नाही. मला विराट कोहलीचा अॅटिट्यूड आवडतो, मात्र तो भांडण खूप करतो, असे गांगुली म्हणाल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. गांगुली संकेतांमधून बोलत असले तरी, बीसीसीआय यावर अद्याप अधिकृतरित्या काहीही बोलले नाही. 15 सप्टेंबरला विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत, त्याचे उत्तर देण्यासाठी निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा पत्रकार परिषद घेऊन कोहलीला जबाव देणार होते, मात्र त्यांना थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोहलीच्या पत्रकार परिषदेवर बीसीसीआय नारज आणि सौरव गांगुली रागात असल्याची चर्चा आहे.