हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले, मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक अट पूर्ण करावी लागणार

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये अत्यंत खराब कामगिरीनंतर टीम इंडियातून बाहेर पडलेला हार्दिक पंड्या अजूनही संघात पुनरागमन करू शकतो. वृत्तानुसार, बीसीसीआयचे काही अधिकारी आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा अजूनही हार्दिक पंड्यावर विश्वास आहे.

हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले, मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक अट पूर्ण करावी लागणार
हार्दिक पंड्या
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 6:23 PM

मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 मध्ये अत्यंत खराब कामगिरीनंतर टीम इंडियातून बाहेर पडलेला हार्दिक पंड्या अजूनही संघात पुनरागमन करू शकतो. वृत्तानुसार, बीसीसीआयचे काही अधिकारी आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा अजूनही हार्दिक पंड्यावर विश्वास आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी हार्दिक पंड्याला फक्त एक अट पूर्ण करावी लागणार आहे. ही फिटनेसची अट आहे जी त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सिद्ध करावी लागेल. हार्दिक पंड्या खराब फिटनेसमुळे गोलंदाजी करू शकत नाही आणि त्याला फलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये स्थान मिळणे कठीण आहे. (BCCI Rahul dravid wants Hardik Pandya to prove his fitness at NCA before South Africa tour)

इनसाइड स्पोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “जर हार्दिक पंड्याला संघात परतायचे असेल तर त्याला एनसीएची फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. हार्दिक पंड्याचे दुखापतीतून सावरणे विश्रांतीवर अवलंबून आहे. त्याने लवकरात लवकर एनसीए गाठावे, त्यानंतर आम्ही त्याच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याबाबत निर्णय घेऊ.”

हार्दिक पांड्या कसोटीसाठी फिट नाही!

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, हार्दिक पंड्या सध्या कसोटी सामने खेळण्यासाठी तंदुरुस्त (फिट) नाही, कारण या फॉरमॅटमध्ये अधिक फिटनेस आवश्यक आहे. तो म्हणाला, ‘हार्दिक पंड्याला कसोटी फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी वेळ लागेल. आम्हाला घाई करायची नाही कारण पुढचा विश्वचषक येणार आहे. जर तो फिटनेस टेस्ट पास झाला तर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत संधी दिली जाईल.

पंड्यावर द्रविडला विश्वास

अहवालानुसार, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड अजूनही हार्दिक पंड्याला टीम इंडियाचा अव्वल अष्टपैलू खेळाडू मातो, त्यामुळे त्याच्यासाठी संघाचे दरवाजे खुले आहेत. द्रविडची इच्छा आहे की, पंड्याने एनसीएमध्ये रिकव्हरी प्रोग्राम पूर्ण करावा. त्यानंतर त्याने सिलेक्शन मीटिंगपूर्वी फिटनेस टेस्ट पूर्ण करावी. हार्दिक पंड्याला पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात 17 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. 11 जानेवारीपासून वनडे-टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

इतर बातम्या

IND vs NZ, 3rd T20, LIVE Streaming: टीम इंडियाला न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याची संधी, मॅच कुठं पाहणार?

महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताच्या खिशात, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा शानदार विजय

(BCCI Rahul dravid wants Hardik Pandya to prove his fitness at NCA before South Africa tour)

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.