IND vs WI : Rohit Sharma ने त्याचं करिअर जवळपास संपवलेलच, पण आता हार्दिक पांड्याने संधी देऊन वाचवलं
IND vs WI : युजवेंद्र चहलमुळे त्याला टीम इंडियात संधी मिळत नव्हती. चहलपेक्षा त्याच्या गोलंदाजीत वेग जास्त आहे. त्यामुळे समोरच्या फलंदाजांसाठी चहलपेक्षा तो जास्त धोकादायक आहे. अखेर न्याय झाला. त्याला संधी मिळाली.
नवी दिल्ली : टीम इंडियाकडून खेळलेल्या एका प्लेयरच करिअर जवळपास संपण्याच्या मार्गावर होतं. पण BCCI ने या प्लेयरला पुन्हा एकदा संधी दिलीय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली T20 टीममध्ये या प्लेयरला संधी दिलीय. त्याला एकप्रकारे जीवनदान दिलय. वेस्ट इंडिज विरुद्ध पाच T20 सामन्याची सीरीज होणार आहे. BCCI च्या सिलेक्शन कमिटीने काल या सीरीजसाठी टीमची घोषणा केली. रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली T20 टीममध्ये या प्लेयरला संधी देत नव्हता.
त्याला टीममधून बाहेर केलं होतं. आता या प्लेयरला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीममध्ये संधी मिळालीय. मागच्या एकवर्षापासून या प्लेयरवर अन्याय सुरु होता.
हार्दिक पांड्याने त्याचं करिअर वाचवलं
टीम इंडियाकडून खेळलेल्या या प्लेयरच करिअर हार्दिक पांड्याने वाचवलं. भारताचा घातक लेग स्पिनर रवी बिश्नोईची वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या सीरीजसाठी टीममध्ये निवड झालीय. रवी बिश्नोई 4 सप्टेंबर 2022 रोजी पाकिस्तान विरुद्ध आपला शेवटचा टी 20 सामना खेळला होता. आशिया कपमधील हा सामना होता. रवी बिश्नोई दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 ऑक्टोबर 2022 रोजी शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर हा घातक लेग स्पिनर टीमच्या बाहेर होता.
म्हणून तो चहलपेक्षा जास्त घातक
युजवेंद्र चहलच्या तुलनेत रवी बिश्नोई घातक लेगस्पिनर आहे. तो भारतासाठी आतापर्यंत 10 T20 सामने खेळलाय. यात त्याने 17.12 च्या सरासरीने 16 विकेट काढल्या आहेत. रवी बिश्नोई लेग ब्रेक गोलंदाजी करतो. युजवेंद्र चहलच्या तुलनेत त्याच्या चेंडूंना वेग जास्त असतो. त्यामुळे समोरच्या फलंदाजासाठी तो जास्त धोकादायक बनतो. युजवेंद्र चहलमुळे रवी बिश्नोईची T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये निवड झाली नाही. युजवेंद्र चहलला संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
IPL 2023 मध्ये जबरदस्त प्रदर्शन
रवी बिश्नोईने यावर्षी आयपीएल 2023 मध्ये शानदार प्रदर्शन केलं. सिलेक्टर्सच लक्ष त्याने वेधून घेतलं. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने 15 सामन्यात 16 विकेट काढले. वेगवान गोलंदाज आवेश खान आणि रवी बिश्नोई या दोघांनी टीम इंडियात पुनरागमन केलय. टीममध्ये तीन मनगटी स्पिनर आहेत. यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल 15 सदस्यीय टीमचा भाग आहे. विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.