ईशान किशन याला वॉर्निंग, जय शाह यांनी लिहिले कडक पत्र
Ishan Kishan, Jay Shah Letter | भारतीय क्रिकेटसाठी आमचे व्हिजन क्लिअर आहे. भारतासाठी क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. भारतीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी हवी. अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होणार आहे.
नवी दिल्ली, दि. 18 फेब्रुवारी 2024 | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर ईशान किशन याला वार्निग मिळाली आहे. ईशान किशन याने आपल्या सोयीनुसार क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. ईशान किशन याने ब्रेक घेताना बीसीसीआय, टीम मॅनेजमेंट, प्रशिक्षक यांनाही काहीच सांगितले. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नाराज झाले आहे. त्यानंतर बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी कडक पावले उचलली आहे. जय शाह यांनी परिणाम वाईट होतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
जय शाह यांनी खेळाडूंना लिहिले पत्र
जय शाह यांनी कॉन्ट्रक्ट आणि इंडिया ए च्या खेळाडूंना पत्र लिहिले आहे. ईशान किशान याच्यामुळे जय शाह यांनी सर्वच खेळाडूंना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशांतर्गत क्रिकेट हे बोर्डासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या खेळाडूने आयपीएलला प्राधान्य दिले आणि देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केले तर ते त्याच्यासाठी चांगले होणार नाही. राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट हा महत्त्वाचा निकष आहे. त्यात सहभागी न झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा जय शाह यांनी सर्वच क्रिकेटपटूंना पत्रातून दिला आहे. जे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत. त्यांना परिणाम वाईट होणार असल्याचे म्हटले आहे.
देशांतर्गत क्रिकेट पेक्षा IPL ला प्राधान्य
काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट पेक्षा आयपीएलला जास्त प्राधान्य देतात. यामुळेच जय शाह यांना पत्र लिहून खेळाडूंना रोखठोकपणे सांगावे लागले. जय शाह यांनी पत्रात लिहिले की, सध्या एक ट्रेंड समोर आला आहे. हा नवीन ट्रेंड चिंतेचा विषय आहे. या ट्रेंडमध्ये काही खेळाडू आयपीएलपेक्षा देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देतात. देशांतर्गत क्रिकेटवर आयपीएल वरचढ होईल, अशी अपेक्षा नव्हती, असे जय शाह यांनी म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटसाठी आमचे व्हिजन क्लिअर आहे. भारतासाठी क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. भारतीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी हवी. अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होणार आहे.