T20 World Cup: वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंचं स्थान पक्कं, 5 जागांसाठी 16 क्रिकेटपटूंमध्ये मुकाबला, कुणाला लॉटरी लागणार?

टी 20 वर्ल्ड कपसाठी आज टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयची त्यासाठी आज महत्वाची बैठक आहे. ह्या बैठकीत कप्तान विराट कोहली आणि कोच रवी शास्त्रीही सहभागी होतील. टी 20 वर्ल्ड कपसाठी एकूण 15 सदस्यांची टीम आज निवडली जाईल.

T20 World Cup: वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंचं स्थान पक्कं, 5 जागांसाठी 16 क्रिकेटपटूंमध्ये मुकाबला, कुणाला लॉटरी लागणार?
रवी शास्त्री आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 3:04 PM

मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी आज टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयची त्यासाठी आज महत्वाची बैठक आहे. ह्या बैठकीत कप्तान विराट कोहली आणि कोच रवी शास्त्रीही सहभागी होतील. अर्थातच ते ऑनलाईन असतील. शास्त्रींना तसही सध्या कोरोनानं गाठलेलं आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी एकूण 15 सदस्यांची टीम आज निवडली जाईल. त्यातल्या 10 खेळाडूंचं टीममधलं स्थान पक्कं मानलं जातंय. इतर 5 जागांसाठी 16 क्रिकेटर्सची दावेदारी आहे.

टी 20 वर्ल्ड कप हा (T20 World Cup 2021) हा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियानं 2007 नंतर एकही टी 20 चा वर्ल्ड कप जिंकलेला नाही. विराट कोहलीच्या संघाला तो जिंकण्याची संधी आहे.

कुणाचं स्थान पक्कं?

टी 20 वर्ल्ड कपसाठी जी टीम निवडली जाईल त्यात 10 क्रिकेटपटूंचं स्थान पक्कं असल्याचं क्रिकइंफोच्या बातमीत म्हटलंय. हे खेळाडू आहेत-विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार आणि युजवेंद्र चहल. त्यामुळे इतर 5 खेळाडू कोण असतील याबद्दल मोठी उत्सुकता आहे. पाच जागा आणि दावेदार 16 त्यामुळे स्पर्धा तगडी आहे. तसंच टीमसोबत तीन रिजर्व खेळाडूही यूएईला जाणार.

टीममध्ये अतिरीक्त बॅटसमन असेल?

टीममध्ये हार्दीक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्याशिवाय 5 स्पेशलिस्ट बॅटसमन आहेत. त्यामुळेच टीममध्ये आणखी एखाद्या बॅटसमनला जागा मिळणार का याचीही उत्सुकता आहे. तसं झालं तर मग शिखर धवन, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांच्यात मुकाबला आहे. फक्त बॅटसमनच नाही तर आणखी दोन फास्ट बॉलर्सनाही टीममध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शार्दूल ठाकूर, दीपक चहर, टी नटराजन, मोहम्मद सिराज आणि शमीमध्ये रेस आहे.

तिसरा ऑलराऊंडर कोण?

टीमध्ये स्पिन ऑलराऊंडर कोण असेल? त्यासाठी तीन नावं रेसमध्ये आहेत. अक्षर पटेल, क्रुणाल पंड्या आणि वाशिंग्टन सुंदर. सध्या तरी सुंदर जखमी आहे. पण त्याला रिजर्व खेळाडू म्हणून घेतलं जाऊ शकतं. आणखी एक स्पेशलिस्ट स्पिन बॉलरची टीमला गरज लागेल. त्यात आर. अश्विन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती यांच्या नावाची चर्चा आहे. पण अश्विन बऱ्याच काळापासून टी 20 खेळलेला नाहीय. त्यामुळे त्याला संधी मिळेल का याबाबत साशंकताच आहे. वरुण चक्रवर्तीचा फिटनेसचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळेच राहुल चहरला संधीची दाट शक्यता आहे.

(BCCI Selection Committee india Squad for Cricket T20 World Cup 2021 )

हे ही वाचा :

मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या शार्दूलचा क्रिकेट प्रवास, ऑस्ट्रेलियापासून ते इंग्लंडपर्यंत हवा, असा घडला ‘Lord शार्दूल ठाकूर’

Birthday Special : तरुण-तडफदार युवा फलंदाज, भारतीय क्रिकेटचं भविष्य, विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.