Team India : Ravindra jadeja ला परफेक्ट पर्याय ठरला असता, पण आता ‘तो’ टीममध्ये सिलेक्शनसाठी तरसतोय
Team India : BCCI आणि सिलेक्टर्सनी एका चांगल्या ऑलराऊंडरकडे पाठ फिरवली. प्रत्येक IPL मध्ये या खेळाडूने आपली क्षमता दाखवून दिली. मात्र, तरीही सिलेक्टर्सनी त्याच्या नावाचा का विचार केला नाही? हे न उलगडणार कोडं आहे.

मुंबई : BCCI आणि सिलेक्टर्सनी एका ऑलराऊंडरकडे पाठ फिरवलीय. भारताचा हा क्रिकेटपटू आयपीएलमधील दमदार प्रदर्शनामुळे टीम इंडियात एंट्री करण्याच्या उंबरठ्यावर होता. पण आता या प्लेयरला कोणी विचारत नाही. हा खेळाडू आयपीएलमधील आपल्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर रवींद्र जाडेजा सारख्या ऑलराऊंडर समोर आव्हान निर्माण करत होता. पण आता टीम इंडियात संधी मिळण्यासाठी हा प्लेयर तरसतोय.
सध्याची टीम इंडियाची योजना पाहत त्याला संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. महत्वाच म्हणजे हा प्लेयर टॅलेंटेड असून मॅच फिनिशिंगची त्याची क्षमता आहे.
जबरदस्त कामगिरी करुनही निराशा
बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही विभागात रवींद्र जाडेजाची सरस कामगिरी आहे. रवींद्र जाडेजा एक चांगला फिनिशर सुद्धा आहे. आम्ही ज्या क्रिकेटरबद्दल बोलतोय, त्याच्याकडे सिलेक्टर्सनी पाठ फिरवली आहे. ल्यामुळे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी करुनही तो निराश आहे.
मजबूत दावेदार होता
संधी मिळाली नाही, म्हणून ज्या क्रिकेटरबद्दल बोलतोय, त्याच नाव आहे, राहुल तेवतिया. भारताच्या धोकादायक फिनिशर्समध्ये त्याचा समावेश होतो. राहुल तेवतियाने IPL मध्ये अनेक सामने फिनिश करुन टीम इंडियात समावेशासाठी दावा ठोकला होता. सिलेक्टर्सनी संधी दिली असती, तर तो रवींद्र जाडेजाला पर्याय ठरला असता.
आक्रमक बॅटिंगशिवाय लेग स्पिन गोलंदाजी
राहुल तेवतिया गुजरात टायटन्सकडून खेळतो. IPL 2022 मध्ये 16 सामन्यात 31 च्या सरासरीने 147.61 च्या स्ट्राइक रेटने त्याने 217 धावा फटकावल्या होत्या. राहुलने आयपीएल 2023 मध्ये 17 सामन्यात 152.63 च्या स्ट्राइक रेटने 87 धावा केल्या. राहुल तेवतिया आक्रमक बॅटिंगशिवाय लेग स्पिन गोलंदाजी सुद्धा करतो. राहुल तेवतियाचा खतरनाक फिनिशर्समध्ये समावेश होतो. राहुल तेवतियाने गुजरात टायटन्सला IPL 2022 च पहिल जेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, तरीही सिलेक्टर्सनी त्याला टीम इंडियात संधी दिली नाही. मॅच फिनिश करताना एमएस धोनीसारखा कुल
राहुल तेवतियाला आपल्या मॅच फिनिश करण्याच्या क्षमतेवर पूर्ण भरवसा आहे. त्यामुळेच मागच्या दोन वर्षांपासून तो गुजरात टायटन्स टीमची ताकत आहे. गुजरात टायटन्स आयपीएल 2022 मध्ये चॅम्पियन आणि 2023 मध्ये उपविजेतेपद मिळवलं, या दोन्ही सीजनमध्ये राहुल तेवतियाने चांगली कामगिरी केली. राहुल तेवतिया मॅच फिनिश करताना एमएस धोनीसारखा कुल असतो. राहुल तेवतियाने 2020 मध्ये शेल्डन कॉटरेलच्या एका ओव्हरमध्ये 5 सिक्स मारले होते.