Photo : श्रीलंका सर करण्यासाठी टीम इंडियाची प्रॅक्टिस जोमात सुरु, बीसीसीआयने शेअर केले सरावाचे फोटो

श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. दिग्गज खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असले तरी भारताकडे नव्या दमाचे युवा खेळाडू आहेत. त्यामुळे हे नव्या दमाचे खेळाडू कशी कामगिरी करणार हे पहावे लागेल.

| Updated on: Jul 03, 2021 | 3:51 PM
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) न्यूझीलंड संघाकडून पराभूत झाला आणि जगज्जेता होण्यापासून थोडक्यात राहिला. या पराभवानंतर आता पुन्हा विजयी घौडदौड सुरु कण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. त्यासाठी आता भारताचे युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. नुकताच संघाने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करुन सरावाला सुरुवात केली आहे. याच सरावाचे काही फोटो बीसीसीआयने (BCCI) शेअर केले असून यामध्ये सर्व खेळाडू मेहनत करताना दिसत आहेत.

1 / 4
श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा दिग्गज खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधारपदाची तर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच माजी खेळाडू राहुल द्राविडला (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक पदाचा भार सोपवण्यात आला आहे. दरम्यान वरच्या फोटोत श्रीलंकेविरुद्ध शिखर आणि राहुल संघाची रणनीती तयार करत असावे.

2 / 4
श्रीलंका दौऱ्यात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्य़ात आली आहे. तसेच टी-20 विश्वचषक जवळ आला असल्याने कोणत्या नव्या खेळाडूंना विश्वचषकात संधी द्यायची हे ठरवण्यासाठी बीसीसीआयचे निवडकर्ते भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला हे दोघेही संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी भारताचे तीन युवा फलंदाज इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांच्यात काटेंकी टक्कर असले. कारण तिघांनी आयपीएलमध्ये स्वत:चा अप्रतिम खेळ दाखवल्याने विश्वचषकासाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वरील फोटोत मुंबई इंडियन्सचे खेळाडू असणारे इशान किशन (Ishan Kishan) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) सराव करत आहेत.

3 / 4
टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल. यावेळी नवख्या खेळाडूंसह अनुभवी पण काही सामन्यांपासून संघाबाहेर असणाऱ्या फिरकीपटू जोडी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) यांच्याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.