IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ आनंदी, प्रत्येकानं सांगितल्या मनातील भावना, पाहा VIDEO
भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानात 2014 नंतर प्रथमच विजय मिळवत पुन्हा एकदा सोनेरी आठवणींना उजाळा दिला. या आनंदाच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी आपल्या भावना शेअर केल्या आहेत.
लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्च्या ऐतिहासिक मैदानात पार पडलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. इंग्लंड संघासोबत पूर्वीपासूनचं सामने अत्यंत चूरशीचे होत असतात. त्यामुळे हा विजय कोट्यवधी भारतीयासांठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यात लॉर्ड्स मैदानात सामना जिंकल्याचा आनंद प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर दिसत होता. दरम्यान या विजयानंतर प्रत्येक खेळाडूच्या भावना एका छोट्या व्हिडीओच्या स्वरुपात बीसीसीआयने (BCCI) शेअर केल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये सर्वात आधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणतो, ”आम्ही याआधीही अनेक परदेशात जाऊन सामने जिंकले आहेत. पण आजचा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. याचं संपूर्ण श्रेय सर्व संघाला जातं.” विराटनंतर उपकर्णधार अजिंक्यने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”संपूर्ण संघाने अप्रतिम कामगिरी केली. पण दुसऱ्या डावातील खेळ विजयात महत्त्वाचा ठरला. हा विजय आमच्यासाठी खूप खास आहे.”
सलामीवीर रोहित-राहुल म्हणाले…
सामन्यात सुरुवातीला एक भक्कम अशी शतकी भागिदारी करुन देणारे भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनीही आपल्या भावना शेअर केल्या. रोहित म्हणाला, ”हा विजय एक किंवा दोन जणांनी नाही, तर संपूर्ण 11 जणांनी मिळून मिळवून दिला आहे. प्रत्येकानी गरजेच्या वेळी आपला खेळ दाखवत सामना विजयाच्या दिशेने नेला.” तर राहुल म्हणाला,”इंग्लंडसारख्या देशात विजय मिळवणं एक मोठी आणि खास गोष्ट आहे. मागील 2.5 महिन्यांहून अधिक काळ आम्ही सराव केल्याचं हे फळ आहे.”
ही कामगिरी कायम ठेवण्याकडे लक्ष – पुजारा
सामन्यात काही खास कामगिरी केली नसली तरी गरजेच्या क्षणी रहाणेसोबत ठामपणे उभा राहिलेल्या चेतेश्वर पुजाराने देखील आनंद व्यक्त केला. पण आणखी तीन सामने शिल्लक असून अशीच कामगिरी कायम ठेवणे गरजेचे असल्याचे पुजारा म्हणाला. व्हिडीओत अखेर गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी हिंदीत प्रतिक्रिया देत आपलं मत मांडले. शमीने या विजयानंतरचा आत्मविश्वास पुढील सामन्यात ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर सिराजने देशासाठी अशाप्रकारे सामना जिंकवून देणं माझ्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याचं सांगितलं.
Reliving Lord’s triumph from the dressing room ? ?
The range of emotions, the reactions & the aura in the #TeamIndia dressing room post the historic win at the @HomeOfCricket. ? ? – by @RajalArora
Watch this special feature ? ? #ENGvINDhttps://t.co/9WFzGX4rDi pic.twitter.com/uR63cLS7j4
— BCCI (@BCCI) August 17, 2021
इतर बातम्या
IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय
IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO
(BCCI Shares Video of indian players reaction after winning lords test against England)