IPL 2022 बाबत मोठी माहिती समोर, स्पर्धेत होणार मोठे बदल, संघाची संख्या वाढवणार, ‘या’ कंपन्यामध्ये संघ विकत घेण्यासाठी चुरस
कोरोना विषाणूच्या संकटामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2021 आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार असून बीसीसीआयने आयपीएल 2022 च्या तयारीला ही सुरुवात केली आहे.
मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या उर्वरीत सामन्यांना काही दिवसांत सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेली स्पर्धा पुन्हा सुरु करण्याची घोषणार काही दिवासांपूर्वीच बीसीसीआयने (BCCI) केली. दरम्यान आय़पीएल 2021 पार पडण्याआधीच पुढील आयपीएलची (IPL 2022) तयारी बीसीसीआय़ने सुरु केली आहे. यावेळी आयपीएलमध्ये काही मोठ्या घोषणा करण्यात येणार असल्याचेही यावेळी समोर आले आहे.
बीसीसीआयने पुढील आयपीएलमध्ये संघाची संख्या वाढवून 8 च्या जागी 10 करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी एक टेंडर डॉक्यूमेंट ऑगस्ट महिन्यात येणार असून ऑक्टोबरच्या दरम्यान यासंबधी लीलाव होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
या कंपन्या संघ घेण्याची शक्यता
सध्या आयपीएलमध्ये असणाऱ्या बहुतेक टीम्स या मोठ्या कंपन्याच्या मालकिचे आहेत. त्याप्रमाणेच नव्या येणाऱ्या दोन संघासाठी देखील देशातील अनेक कॉर्पोरेट घरान्यांनी (कंपन्यानी) तयारी सुरु केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार यामध्ये कोलकाता स्थित आरपी-संजीव गोयंका, अहमदाबाद स्थित अडानी ग्रुप, हैद्राबाद स्थित अरबिंदो फार्मा लिमिटेड आणि टॉरंट ग्रुप संघ घेण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान संजीव गोयंका ग्रुपची टीम रायसिंग पुणे सुपरजाएंट याआधी 2016 आणि 2017 हे दोन सीझन आयपीएलमध्ये खेळली होती. लिलावासंबधी माहिती देखील टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात समोर आली आहे. त्यानुसार बीसीसीआय या वर्षाच्या अखेरीस मोठा लिलाव भरवण्याची शक्यता आहे. तसेच मीडिया राइट्सबाबतचा मोठा लिलावही यावेळी होऊ शकतो.
संघाच्या सॅलरी पर्समध्येही वाढ
बीसीसीआयने आगामी IPL 2022 साठी नव्या नियमांत संघाची सॅलरी पर्समधील रक्कम ही वाढवली आहे. त्यामुळे संघाकडे खेळाडू विकत घेण्यासाठी 85 कोटी नाहीतर 90 कोटी असणार आहेत. त्यामुळे 10 संघाचा विचार करता एकूण 50 कोटींची बढत करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात ही रक्कम 90 वरुन 95 कोटी होऊ शकते, 2024 पर्यंततर ही रक्कम 100 कोटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खेळाडू कायम ठेवण्याबाबतही नवे नियम
नव्या नियमांनुसार प्रत्येक संघाला चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी असेल. पण यासाठी संघाला काही नियमांचे पालन करावे लागेल. जसेकी तीन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू किंवा दोन भारतीय आणि दोन विदेशी खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय
IPL 2021 मध्ये परदेशी खेळाडू खेळण्याची दाट शक्यता, BCCI करत आहे ‘हे’ प्रयत्न
(BCCI Starts Preparing For IPL 2022 Mega Auction with 10 IPL teams and new Franchise)