Jasprit bumrah बद्दल रोहित शर्मा, द्रविडला सुद्धा सांगणार नाही का? हैराण करुन सोडणारी बातमी
Jasprit bumrah injury update : जसप्रीत बुमराह याआधी 25 सप्टेंबर 2022 रोजी मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मॅचनंतर बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत झाल्याची बातमी आली.
Jasprit bumrah injury update : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची दुखापत सर्वांसाठीच कोड बनलीय. मागच्या सहा महिन्यांपासून तो दुखापतीमुळे बाहरे आहे. अजूनही त्याच्या पुनरागमनाला काही महिने लागणार आहेत. प्रत्येक सीरीज येतेय, तसं फॅन्स बुमराह आता पुनरागमन करेल, अशा अपेक्षा बाळगून असतात. पण घडतं काहीतरी वेगळच. बुमराहच्या दुखापतीबद्दल इतकं सस्पेन्स बनवल जातय की, हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्माला सुद्धा त्या बद्दल माहित नाहीय. बीसीसीआय बुमराहच्या इंजरीबद्दल कोणालाही अपडेट देत नाहीय.
जसप्रीत बुमराह याआधी 25 सप्टेंबर 2022 रोजी मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मॅचनंतर बुमराहला स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत झाल्याची बातमी आली. आता तो पुढच्या सीरीजमध्ये खेळणार नाहीय. यावर्षी बुमराह पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पण असं घडलं नाही. तेव्हापासून बीसीसीआयने आतापर्यंत अधिकृतरित्या कुठलही स्टेटमेंट केलेलं नाही.
सिलेक्शन कमिटीलाही स्पष्टपणे सांगितलय
बीसीसीआय बुमराहच्या रिहॅबपासून त्याच्या पुनरागमनाबद्दल कुठलीही अपडेट देत नाहीय. त्याच्या इंजरी स्टेटसबद्दल गोपनीयता बाळगली जातेय. बीसीसीआयमध्येही बऱ्याच लोकांना या बद्दल माहिती नाहीय. NCA चे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि फिजियोंना बुमराहसोबत बोलण्याची परवानगी आहे, बुमराहच्या इंजरीबद्दल तुम्हाला नंतर अपडेट करण्यात येईल, असं सिलेक्शन कमिटीला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.
बुमराह कधीपर्यंत परतणार?
या महिन्याच्या सुरुवातीला बातमी आली होती की, स्ट्रेस फ्रॅक्चर झालेल्या बुमराहवरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. पण त्याच्या पुनरागमनाला अजून काही महिने लागणार आहेत. बुमराह जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार नाहीय. आशिया कपमध्ये खेळण्याची शक्यताही कमी आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज Action मध्ये कधी येणार? ते बीसीसीआयच सांगू शकेल. बुमराहच्या नसण्याच नुकसान टीम इंडिया बरोबर मुंबई इंडियन्सलाही होणार आहे.