ind vs wi | वागणूक सुधारा अन्यथा वेस्ट इंडिज दौऱ्यावर संधी विसरा, IPL चे ‘ते’ चार स्टार BCCI च्या रडारवर
ind vs wi | बीसीसीआयची निवड समिती यापुढे फक्त मैदानावरील खेळाडूची कामगिरी लक्षात घेणार नाही. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या T20 सीरीजसाठी अजून टीम निवडलेली नाही. IPL 2023 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या काही प्लेयर्सना निवडीची अपेक्षा आहे.
मुंबई : टीम इंडियात निवडीसाठी, यापुढे खेळाडूंची फक्त मैदानावरील कामगिरी लक्षात घेतली जाणार नाही. क्रिकेटपटूंना खेळाबरोबरच अन्य बाबींची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. अन्यथा त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. खेळाडूंना सिलेक्टर्स आणि बीसीसीआयच्या गुड बुक्समध्ये रहाव लागणार आहे. टीममध्ये निवड करताना खेळाडूची मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वर्तणूक कशी आहे? ते लक्षात घेतलं जाईल.
IPL 2023 मधील काही स्टार क्रिकेटपटू बीसीसीआयच्या रडारवर आहेत. यामागे कारण आहे, त्यांचं खराब वर्तन. या खेळाडूंच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, तर वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या T20 सीरीजमधून त्यांचा पत्ता कट होऊ शकतो.
चार क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची नजर
क्रिकबजच्या वृत्तानुसार, IPL 2023 मधील चार क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची नजर असेल. या खेळाडूंची नाव अजून समजू शकलेली नाहीत. सध्या सर्फराज खानच्या नावाची चर्चा आहे. देशांतर्गत खासकरुन रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्फराज खानने धावांचा पाऊस पाडला. मात्र इतका चांगला परफॉर्मन्स करुनही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी त्याची टीम इंडियात निवड केली नाही.
सर्फराजीच निवड न होण्यामागच दुसरं कारण काय?
सर्फराज खानची निवड का केली नाही? त्या बद्दल काहीही अधिकृत सांगण्यात आलेलं नाहीय. पण त्याचं मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वर्तन बीसीसीआय आणि सिलेक्टर्सना पसंत नव्हतं. त्यामुळे त्याची निवड झाली नाही, अशी चर्चा आहे.
बीसीसीआय काय पाहणार?
वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 सीरीजसाठी अजून टीमची निवड झालेली नाही. IPL 2023 मध्ये दमदार परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूंना टीममध्ये निवड होईल, अशी अपेक्षा आहे. पण बीसीसीआय टीममध्ये निवड करताना त्यांच्या वर्तनाचा मुद्दा सुद्धा लक्षात घेणार आहे. T20 सीरीजसाठी टीमची निवड कधी?
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी T20 टीमची निवड अजून बाकी आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात T20 सीरीजसाठी संघनिवड होऊ शकते. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात T20 टीम वेस्ट इंडिजसाठी रवाना होईल. 3 ऑगस्टपासून सीरीज सुरु होणार असून हार्दिक पांड्या टी 20 टीमच नेतृत्व करेल.