नाशिकची मुलगी IPL गाजवणार, दुष्काळी सिन्नरमधुन आलेली माया फिरकीच्या तालावर नाचवणार

मायाची 'व्हेलॉसिटी' संघात निवड झाली आहे. मायाचा आयपीएलपर्यंतचा प्रवास सोपा नाही. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यातून माया येते.

नाशिकची मुलगी IPL गाजवणार, दुष्काळी सिन्नरमधुन आलेली माया फिरकीच्या तालावर नाचवणार
Maya sonawane
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:34 PM

मुंबई: यंदा पुरुषांप्रमाणे महिलांची सुद्धा IPL स्पर्धा होणार आहे. सोमवारी बीसीसीआयने महिला आयपीएलच्या तीन संघांची घोषणा केली. यातील एका टीममध्ये नाशिकच्या प्रतिभावान माया सोनावणेची (Maya sonavane) निवड झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून हाताच्या बोटावर मोजण्या इतपत क्रिकेटपटुंनी भारतीय संघात धडक मारली आहे. यात नाशकात बालपण घालवणारे बापू नाडकर्णी, देवळातील वास्तव्य केलेल्या सलील अंकोला (salil ankola) यांनी मुंबईतून खेळून भारतीय संघात स्थान मिळवलं. पण मूळ नाशिककर अजूनही भारतीय संघात पोहोचलेला नाही. माया सोनावणेच्या रुपाने ते स्वप्न साकार व्हावं, अशीच इच्छा आहे. मायाला आता आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे. इथे नवलौकीक कमवून तिने भारतीय संघात स्थान मिळवावं, अशीच नाशिककरांची इच्छा आहे. नाशिकचे अनेक क्रिकेटपटू महाराष्ट्राच्या रणजी संघातून चमकले. पण त्यांना भारतीय संघापर्यंत मजल मारता आली नाही.

सिन्नरमध्ये मुलींनी क्रिकेट खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट

मायाची ‘व्हेलॉसिटी’ संघात निवड झाली आहे. मायाचा आयपीएलपर्यंतचा प्रवास सोपा नाही. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यातून माया येते. सिन्नरमध्ये मुलींनी क्रिकेट खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. सिन्नरचे क्रिकेट प्रशिक्षक सुनील कानडी यांनी मायाला क्रिकेटकडे वळवलं. मुली क्रिकेट खेळतात, म्हणून अनेकदा त्यांची खिल्ली सुद्धा उडवली गेली. पण प्रशिक्षक कानडी आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या मायाने आपला प्रवास सुरुच ठेवला. अखेर आज तिला आयपीएलच्या रुपाने यश मिळालं आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या मायाने खडतर परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवलय.

लेग स्पिन गोलंदाजी मायाची ताकत

बीसीसीआयने आयपीएलच्या धर्तीवर महिलांसाठी टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धा आयोजित केली आहे. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या दिग्गज महिला क्रिकेटपटू सुद्धा खेळणार आहे. मायाला त्यांच्यासोबत खेळण्याचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. माया उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे. लेग स्पिन गोलंदाजी करण्याबरोबर ती लोअर मिडल ऑडरला आवश्यक असणारी फटकेबाजी सुद्धा करु शकते. मागच्यावर्षी NCA मध्ये 35 खेळाडूंमध्ये मायाची निवड झाली होती. पुदुचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी 20 स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना चांगली कामगिरी केली होती.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.