Jasprit Bumrah आणि हार्दिकच्या बाबतीत BCCI कडून असा भेदभाव? बुमराहला 7 कोटी रुपये का दिले?
Jasprit Bumrah : BCCI जो निर्णय घेतलाय, त्यातून हा फरक लगेच लक्षात येतो. एकाला एक न्याय, दुसऱ्याला वेगळा असं का? बीसीसीआयच्या या निर्णयावरुन वाद होऊ शकतो.
BCCI Contract News : BCCI ने काल वार्षिक कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली. या कॉन्ट्रॅक्टमध्ये A+, A, B आणि C4 ग्रेड आहेत. बीसीसीआयचा सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट A+ ग्रेडमध्ये येतो. त्यात यंदा रवींद्र जाडेजाची एंट्री झालीय. 7 कोटी रुपयांच्या या ग्रेडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह पहिल्यापासून आहेत. A+ कॉन्ट्रॅक्टमध्ये बुमराहच नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. बुमराहचा या ग्रेडमध्ये कसा समावेश केला? हा प्रश्न अनेकांना पडलाय.
जसप्रीत बुमराहचा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये समावेश होतो. बीसीसीआयचा हा कॉन्ट्रॅक्ट ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 सीजनसाठी आहे. बुमराह 25 सप्टेंबर 2022 पासून भारतसाठी एकही मॅच खेळलेला नाही. तो कधी पुनरामगन करणार? या बद्दल कुठलीही ठोस माहिती नाहीय. असं असताना बोर्डाने कुठल्या आधारावर बुमराहला A+ च्या श्रेणीमध्ये ठेवलय हा प्रश्न आहे.
हार्दिक आणि बुमराहमध्ये भेदभाव का?
A+ श्रेणीमध्ये 3 ऐवजी 4 खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. बुमराहच A+ मध्ये नाव आल्यापासून वादाला तोंड फुटलय. मागच्या कॉन्ट्रॅक्टच्यावेळी दुखापतीमुळे हार्दिक पंड्याचे 2 ग्रेड घसरले होते. हार्दिक पंड्याने मागच्यावर्षी वर्षभरानंतर जुलै महिन्यात टीममध्ये पुनरागमन केलं होतं. तो वर्षभर दुखापतीशी झुंज देत होता. त्याचा फटका त्याला 2021-2022 च्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बसला. ए श्रेणी मधून तो थेट सी मध्ये पोहोचला होता. ग्रेड घसरल्यानंतर त्याने जुलै महिन्यात टीममध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून तो टीमचा महत्वाचा भाग आहे. त्याचा फायदा त्याला झाला. 5 कोटीच्या ए ग्रेडमध्ये तो पोहोचला.
वर्ल्ड कप खेळण्यावर संकट
दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहिल्याने हार्दिक पंड्याच्या 2 ग्रेडमध्ये घसरण होते. मग जसप्रीत बुमराह A+ ग्रेडमध्ये कसा?. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाला अजून बराच वेळ लागू शकतो. त्याला मागच्यावर्षीपासून पाठदुखीचा त्रास सुरु झालेला. दुखापतीमुळे आधी तो आशिया कपमधून बाहेर गेला. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपला मुकला. यंदा होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये बुमराह खेळणार की, नाही? या बद्दलही कुठली शाश्वती नाहीय.