T20 World Cup 2024 : प्लेयर नाहीत, ऑस्ट्रेलिया 40 पेक्षा जास्त वयाच्या 4 खेळाडूंना मैदानावर उतरवणार

T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाकडे सध्या फक्त 9 खेळाडू आहेत. हे असं यासाठी घडतय कारण, पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, मिचेल स्टार्क, कॅमरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल यांना आराम देण्यात आलाय.

T20 World Cup 2024 : प्लेयर नाहीत, ऑस्ट्रेलिया 40 पेक्षा जास्त वयाच्या 4 खेळाडूंना मैदानावर उतरवणार
Australian playersImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 9:48 AM

T20 वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलियन टीम मोठ्या अडचणीत सापडली आहे. अडचणीच कारण ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कप आधी पुढच्या 4 दिवसात 2 वॉर्मअप मॅच खेळायच्या आहेत. पण त्यांच्याकडे फक्त 9 खेळाडू आहेत. हे सर्व आयपीएलमुळे घडलय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियन टीमला बुधवारी नामीबिया आणि शुक्रवारी वेस्ट इंडिज विरुद्ध अशा दोन प्रॅक्टिस मॅच खेळायच्या आहेत. त्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे फक्त 9 प्लेयर्स उपलब्ध आहेत. त्यात कॅप्टन मिचेल मार्श पहिला वॉर्मअप सामना खेळणार नाहीत. अशावेळी ऑस्ट्रेलियाकडे 8 खेळाडू आहेत. आता त्यांना सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना मैदानावर उतरवाव लागणार आहे. त्याचं वय जवळपास पन्नाशीच्या घरात आहे.

ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. अजूनपर्यंत ते वर्ल्ड कप टीममध्ये दाखल झालेले नाहीत. आयसीसीच्या नियमानुसार, सराव सामन्यात उतरणारे खेळाडू सुद्धा त्याच देशाचे असले पाहिजेत. ऑस्ट्रेलियाला आपल्या सपोर्ट स्टाफमधील हेड कोच एंड्रयू मॅकडॉनल्ड, ब्रॅड हॉज, जॉर्ज बेली आणि आंद्रे बोरोवेक यांना मैदानावर उतरवाव लागू शकतं. ब्रॅड हॉज यांचं वय 49 वर्ष आहे.

ऑस्ट्रेलियन बोर्डाची चूक

हे असं यासाठी घडतय कारण, आयपीएल खेळणाऱ्या पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, मिचेल स्टार्क, कॅमरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल यांना आराम देण्यात आलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएलच्या थकव्यामधून रिकव्हर होण्यासाठी या खेळाडूंना वेळ दिलाय. ऑस्ट्रेलियन बोर्डाचा हाच निर्णय आता टीमसाठी अडचणीचा ठरतोय. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श सुद्धा फिट नसल्याची बातमी आहे. आयपीएल दरम्यान पायाला दुखापत झाली होती, तेव्हापासून तो अजूनपर्यंत मैदानावर उतरलेला नाही. प्रॅक्टिस मॅचमध्ये मार्शला उतरवून ऑस्ट्रेलियाला धोका पत्करायचा नाहीय.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.