Mithali Raj Retirement: टीम इंडियातून वगळणार म्हणून मिताली राजने निवृत्ती घेतली? BCCI ने जाहीर केला महिला संघ
भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राजने (Mithali Raj Retirement) आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
मुंबई: भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राजने (Mithali Raj Retirement) आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 1999 साली करीयर सुरु करणाऱ्या मितालने दोन दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) भारताचं प्रतिनिधीत्व केलं. मितालीने तिची निवृत्ती जाहीर केली असली, तरी संघातून वगळण्याआधीच तिने निवृत्ती घेतल्याची चर्चा रंगली आहे. आज बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. मितालीच्या जागी हरमनप्रीकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. मितालीच्या निवृत्तीच्या टायमिंगमुळे आता ही चर्चा सुरु झालीय. मिताली भारतीय महिला क्रिकेट संघाकडून 232 वनडे आणि 89 T 20 चे सामने खेळली. तिने 12 कसोटी (Test) सामन्यातही देशाचं प्रतिनिधीत्व केलं.
वनडे मध्ये किती धावा केल्या?
वनडेमध्ये मिताली राजने 7805 धावा, तर टी 20 मध्ये 2364 रन्स केल्या. कसोची क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 699 धावा आहेत. मिताली राजच्या नावावर एकूण 8 शतकं आहेत. वनडेमध्ये 7 आणि कसोटीमध्ये 1 सेंच्युरी झळकावली. मिताली राजने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला. 26 जून 1999 रोजी डेब्यु मॅचमध्येच मितालीने शतक ठोकलं. मिताली आयर्लंड विरुद्ध 114 धावांची खेळी खेळली होती. हा सामना भारताने 161 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.
ODI squad: Harmanpreet Kaur (Captain), Smriti Mandhana (VC), Shafali Verma, Yastika Bhatia (wk), S Meghna, Deepti Sharma, Poonam Yadav, Rajeshwari Gayakwad, Simran Bahadur, Richa Ghosh (wk), Pooja Vastrakar, Meghna Singh, Renuka Singh, Taniya Bhatia (wk), Harleen Deol.
— BCCI Women (@BCCIWomen) June 8, 2022
T20I Squad – Harmanpreet Kaur (Captain), Smriti Mandhana (VC), Shafali Verma Yastika Bhatia (wk), S Meghna, Deepti Sharma, Poonam Yadav, Rajeshwari Gayakwad, Simran Bahadur, Richa Ghosh (wk), Pooja Vastrakar, Meghna Singh, Renuka Singh, Jemimah Rodrigues, Radha Yadav.
— BCCI Women (@BCCIWomen) June 8, 2022
मी माझ्या प्रवासात चढ-उतार अनुभवले
मिताली राजने टि्वटरवर निवृत्तीची घोषणा करताना चाहते आणि हितचिंतकांचे आभार मानले. दुसरी इनिंग खेळण्यासाठी आपण सज्ज आहोत, असं मितालीने म्हटलं आहे. “टीम इंडियाची निळी जर्सी परिधान करणं आणि देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही सन्मानाची बाब आहे. मी माझ्या प्रवासात चढ-उतार अनुभवले. मागच्या 23 वर्षात मी बरच काही शिकले आहे. हा माझ्या आयुष्यातला सुंदर आणि संस्मरणीय काळ होता. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतेय” असं मिताली राजने म्हटलं आहे.