इंग्लंडच्या गोलंदाजानं रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण, भारतासाठी धोक्याची घंटा
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. यातील एक खेळाडू भारतासाठी मोठा धोका ठरु शकतो.
लंडन : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket team) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आगामी पर्वातील ही पहिलीच मालिका असल्याने दोन्ही संघ कसून सराव आणि उत्तम रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. भारतीय संघाकडे उत्तम दर्जाचे खेळाडू असले तरी इंग्लंड संघाकडेही काही दिग्गज खेळाडू आहेत. यामध्ये दोन वेगवान गोलंदाज भारतासाठी सर्वात मोठा धोका आहेत. ते म्हणजे जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad). युवराज सिंगने एका षटकात 6 षटकार ठोकणाऱ्या ब्राॉडने मागील काही वर्षात उत्कृष्ठ खेळ दाखवत इंग्लंड संघात मानाचं स्थान मिळवलं. त्याने आजच्याच दिवशी म्हणजे 28 जुलै, 2020 रोजी टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 500 विकेट पूर्ण केले होते.
ब्रॉडने ही कामगिरी 24 ते 28 जुलै, 2020 दरम्यान मॅनचेस्टर येथे इंग्लंड आणि वेस्टइंडीज (England vs West Indies) यांच्यात पार पडलेल्या कसोटी साम्यादरम्यान केली होती. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 369 धावा केल्या. ओली पोपने 91 धावा केल्या.तर जॉस बटलरने 67 धावा केल्या. रोरी बर्न्सने ही 57 धावा करत अर्धशतक ठोकलं. यावेळी स्टुअर्ट ब्रॉडने 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 62 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट विंडीज संघाचा पहिला डाव 197 धावांवर आटोपला. यावेळी ब्रॉडने तब्बल 6 विकेट घेतल्या तर एंडरसनने 2 बळी घेतले. दुसऱ्या डावातही ब्रॉडने चार बळी घेत टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट पूर्ण केले. त्याने क्रेग ब्रॅथवेट याला बाद करत 500 विकेट पूर्ण केले. ब्रॉडने आतापर्यंत 148 टेस्टमध्ये 523 विकेट्स मिळवले आहेत. त्यामुळे चांगल्या फॉर्ममध्ये असणारा ब्रॉड भारतीय फलंदाजासाठी मोठा धोका असणार हे नक्की.
इंग्लंडचा संघ –
जो रूट (कप्तान), जोस बटलर, जॅक लीच, ऑली पोप, जॅक क्रॉली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, सॅम करन, ऑली रॉबिनसन, हसीब हमीद, डॉम सिबले, डॅन लॉरेंस, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, मार्क वुड.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.
हे ही वाचा
IND vs ENG : भारताचे दोन कसोटी फलंदाज संघात परत, ‘हे’ दोन खेळाडू होणार संघातून बाहेर
IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन
IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय
(Before england vs india match england bowler stuart broad took 500th test wicket against west indies on this day)