मोठी बातमी : इंग्लंड क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव, 3 खेळाडूंसह 7 सदस्य कोरोनाबाधित, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची माहिती

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी इंग्लंडचा एकदिवसीय संघ पाकिस्तान बरोबर मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहे.

मोठी बातमी : इंग्लंड क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव, 3 खेळाडूंसह 7 सदस्य कोरोनाबाधित, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची माहिती
England Cricket team
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 2:47 PM

लंडन : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 4 ऑगस्टपासून सुरुवात होणाऱ्या या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडचा एकदिवसीय संघ पाकिस्तान (England-Pakistan) बरोबर मर्यादीत षटकांचे सामने खेळणार होता. पण त्यापूर्वीच इंग्लंडच्या संघावर कोरोनाचं संकट कोसळलं आहे. इंग्लंडच्या क्रिकेट संघातील 3 खेळाडूंसह एकूण 7 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) ही माहिती दिली असून बाधितांना विलगीकरणात ठेवले आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 8 जुलैपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. 8 जुलैला पहिला एकदिवसीय सामन्यानंतर 10 जुलैला दुसरा आणि 13 जुलैला तिसरा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर टी-20 मालिका 16 जुलैपासून सुरु होणार आहे. 16 जुलै,  18 जुलै आणि 20 जुलैला टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची माहिती

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अधिकारी टॉम हॅरीसन (Tom Harrison) यांनी संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती देताना सांगितले की, ”जैव सुरक्षेचे (Bio Bubble) सर्व कठोर नियम आम्ही मागील 14 महिन्यांपासून पाळत आहोत. तरी देखील अखेर कोरोनाचा शिरकाव झाला असून या परिस्थितीवर लवकरात लवकर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

मैदानात प्रेक्षकांना एन्ट्रीची परवानगी आणि संघातच कोरोनाची एन्ट्री

ब्रिटेन सरकारने 5 जुलै रोजी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संकटामुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 19 जुलैपासून सर्व खेळांच्या मैदानात प्रेक्षकांना संपूर्ण क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क वापरणे हे नियम अनिवार्य असतील. ब्रिटिश सरकारने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटंल की, ”चौथ्या टप्प्यात आम्ही इनडोर आणि आऊटडोर अशा सर्व प्रकारच्या सभांना परवानगी दिली आहे. सर्व प्रकारचे व्यापार, नाइट क्लबवरील बॅनही हटवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक आता थिएटर, स्पोर्ट्स इवेंटना जाऊ शकणार आहेत.” दरम्यान असे असतानाच इंग्लंडच्या संघातच कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

हे ही वाचा- 

भारत विरुद्ध इंग्लंड मॅचमध्ये प्रेक्षकांनी खचाखच भरणार मैदान, सामना पाहण्याची परवानगी, इंग्लंड सरकारची अनुमती

आकाश चोप्राने निवडले 21 व्या शतकातील टॉप फलंदाज, विराटला जागा नाही, सचिनही टॉप 3 मधून बाहेर, कोण आहे पहिल्या स्थानावर?

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

(Before England vs Pakistan Series 7 Members of england Mens Team tested Corona positive Informed by England Cricket Board)

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.