IND v ENG : पहिल्या कसोटी सामन्याआधीच इंग्लंडला झटका, महत्त्वाचा फलंदाज दुखापतग्रस्त
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु होण्यास काही तास शिल्लक असताना इंग्लंडचा एक फलंदाज दुखापतीमुळे सामन्याबाहेर गेल्याची माहिती समोर येत आहे.
नॉटिंघम : भारत आणि इंग्लंड (India vs England 1st test) यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच इंग्लंड संघाला (England) एक मोठा झटका बसला आहे. संघाला आधी बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर नंतर आता मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज ओली पोपला (Ollie Pope) गमवावे लागले आहे. दुखापतीमुळे ओली पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
ओली पोपच्या मांड्यामधील मांसपेशींवर ताण आल्याने तो विश्रांती करत आहे. त्यामुळे किमान पहिला कसोटी सामना तरी खेळणार नाही. त्यामुले त्याच्या जागी जॉनी बेयरस्टो याला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना काही वेळातच सुरु होणार असून नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रीजवर हा सामना खेळवला जाईल.
पोप पहिल्या टेस्टला मुकणार – द टेलीग्राफ
द टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, ओली पोप मंगळवारी ट्रेंट ब्रिजमध्ये फिटनेस टेस्ट पास करु शकला नाही. पोपच्या दुखापतीमुळे इंग्लंड नवी रणनीती आखत असून डॅन लॉरेन्ससह संघ सामन्यात उतरु शकतो.डॅनने न्यूझीलंडविरुद्ध 81 धावा केल्या होत्या. याशिवाय जॉनी बेयरस्टोलाही संधी दिली जाऊ शकते. आयपीएल गाजवणाऱ्या बेयरस्टोचा भारताविरुद्धचा रेकॉर्डही चांगला आहे.
Jonny Bairstow set to resume Test career after Ollie Pope ruled out through injury / @NHoultCricket reports #ENGvIND https://t.co/n950APtMpe pic.twitter.com/fNvGJmK1v6
— Telegraph Cricket (@telecricket) August 3, 2021
हे ही वाचा
IND v ENG Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?
IND vs ENG : सलामीवीर मयांक पहिल्या सामन्याला मुकणार, ‘या’ पर्यांयाचा वापर करु शकते टीम इंडिया
(Before first test in india vs eng ollie pope ruled out due to injury jonny bairstow replaces him)