भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच ‘या’ खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई

बहुप्रतिक्षीत अशा भारत आणि श्रीलंका यांच्यातील मर्यादीत ओव्हर्सच्या सामन्यांना काही दिवसांत सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ खेळण्यासाठी उत्सुक असतानाच एका खेळाडूचे निलंबन करण्यात आले असून त्याला लाखो रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच 'या' खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई
India tour Sri lanka
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 5:42 PM

कोलंबो : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत पोहोचला असून दोन्ही संघ सध्या जोमात सराव करत आहेत. मात्र सामने सुरु होण्याआधीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri lanka Cricket Board) डावखुरा फलंदाज भनुका राजपक्षा (Bhanuka Rajapaksa) याला एक वर्षासाठी निलंबित केले आहे. तसेच 5000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे 3.71 लाख भारतीय रुपये इतका दंड ठोठावल आहे. मात्र हे निलंबन दो वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आल्याने भनुका त्वरीत निलंबित होणार नाही. त्यामुळे तो सध्या सरावादरम्यान संघासोबत आहे. तसेच निर्बंध लागू होण्यास काही वेळ असल्याने भारताविरुद्धच्या मालिकेत तो खेळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (Before India vs Sri Lanka Matches Sri Lanka Cricket Board Bans Cricketer Bhanuka Rajapaksa for Breaching Players Contract)

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही कारवाई प्लेयर कॉन्ट्रेक्ट 2019-20 चे उल्लंघन केल्याबद्दल केली आहे. भनुका राजपक्षा याने मीडियासमोर बऱ्याच मुलाखतीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरोधात प्रश्न उपस्थित केले. भनुका राजपक्षाने श्रीलंकन संघातून काढल्याबद्दल सार्वजनिक रूपात विरोध देखील दर्शविला होता. त्याच्या मते इंग्लंड दौऱ्यात त्याला संघात स्थान द्यायला हवं होतं. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटलं होतं की राजपक्षा फलंदाजी चांगली करतो पण क्षेत्ररक्षण त्याचं चांगल नसल्य़ाने आणि फिटनेसही ठिक नसल्याने त्याला खेळताना अडचणी येतात.

Bhanuka Rajpaksha

भनुका राजपक्षा (Bhanuka Rajpaksha)

असे पार पडतील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामने

भारत आणि श्रीलंका संघामध्ये तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल.

हे ही वाचा :

टी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवनला ‘ही’ गोष्ट करणे गरजेचे, वीवीएस लक्ष्मणचा महत्त्वपूर्ण सल्ला

Photo : भारतीय संघ मैदानात, श्रीलंकेच्या भूमित सराव सामन्यात खेळाडू आपआपसांत भिडले, बीसीसीआयने शेअर केले फोटो

WTC Final मध्ये पराभवानंतर श्रीलंका दौरा जिंकण्यासाठी युवा क्रिकेटपटू करतायत मेहनत, बीसीसीआयने शेअर केले फोटो

(Before India vs Sri Lanka Matches Sri Lanka Cricket Board Bans Cricketer Bhanuka Rajapaksa for Breaching Players Contract)

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.