कोरोना विषाणूच्या संकटातही धोनी निघाला हॉलिडेवर, भारतातील ‘या’ शहरात करणार एन्जॉय

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी संपूर्ण परिवारासोबत सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे. भारतातील एका सुंदर शहराची निवड माहीने हॉलिडे घालवण्यासाठी केली आहे.

कोरोना विषाणूच्या संकटातही धोनी निघाला हॉलिडेवर, भारतातील 'या' शहरात करणार एन्जॉय
Dhoni holiday
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 5:22 PM

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे मोठे मोठे सेलेब्रिटी, व्यावसायिक आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी परदेशात जाणे पसंद करत आहेत. अनेक परदेशी खेळाडू आयपीएल (IPL 2021) रद्द होताच मालदिवमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेल्याचेही समोर आले होते. दरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) देखील सुट्ट्या घालवण्यासाठी शिमल्याला पोहोचला आहे. आपल्या परिवारासह जवळच्या लोकांना घेऊन माही शिमल्यात पोहोचला असून एकूण 12 लोकांसह माही शिमलाच्या मेहली परिसरात पोहोचला आहे. (Before IPL 2021 Resumes MS Dhoni Went to Shimla With Family and Friends )

महेंद्र सिंह धोनी शुक्रवारी संध्याकाळी शिमल्याला पोहोचला. त्याच्यासाठी पूर्व रांचीच्या विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी काही सुरक्षारक्षकांनी धोनीसोबत फोटो काढले. जे फोटो व्हायरल झाल्यानंतर धोनी सुट्टी साठी बाहेर पडल्याचे समोर आले आहे.

3 वर्षांत दुसऱ्यांदा शिमल्याला

मागील 3 वर्षांत दोन्ही दुसऱ्यांदा शिमल्याला पोहोचला आहे. याआधी 2018 मध्ये धोनी शिमल्यात गेला होता. त्यावेळेस एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी धोनी शिमल्याला गेला होता. त्याने त्यावेळी तिथे बाईक रायडींग देखील केली होती. मात्र यंदा धोनी कोणत्याही व्यावसायिक कामासाठी नाही तर खाजगी कारणामुळे शिमल्याला आला आहे. त्याच्यासोबत फॅमिली आणि जवळचे असे एकूण 12 लोक आहेत. हिमाचल प्रदेशमधील नियमावली तेथील शासनाने काही दिवसांपूर्वीच काहीशी सैल केली. त्यामुळे केवळ कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास त्याठिकाणी एन्ट्री मिळत आहे.

लवकरच परिवारापासून दुरावणार

सध्या फॅमिलीसोबत वेळ घालवत असलेल्या धोनीला लवकरच फॅमिलीपासून दूर जावे लागणार आहे. बीसीसीआयने उर्वरीत आयपीएल युएईमध्ये सप्टेंबरच्या सुमारास सुरु करणार असल्याचे सांगितले. धोनी चेन्नई सुपरकिंग संघाचा कर्णधार असल्याने तो काही महिन्यांतच युएईला रवाना होऊ शकतो. त्यामुळे काही काळ सुट्टी एन्जॉय केल्यानंतर धोनीला युएईला रवाना होण्याची तयारी करण्यास सुरुवात करायला लागणार आहे.

संबंधित बातम्या 

Photo : तुम्ही पाहिलंत का धोनीचं फार्म हाऊस? कुत्र्यांपासून घोडे आणि फळबागांनी नटलंय

IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, ‘या’ खास रणनीतीचा वापर

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

(Before IPL 2021 Resumes MS Dhoni Went to Shimla With Family and Friends )

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.