Rohit Sharma : ‘शेवट जवळ आलाय’, MI च्या टीममधील या खेळाडूने रोहित शर्माकडे मागितली ऑटोग्राफ
Rohit Sharma : मॅच सुरु होण्याआधी मैदानावर एक प्रसंग घडला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे फॅन्स दु:खी झाले. यंदाचा सीजन मुंबई इंडियन्ससाठी खूप निराशाजनक ठरला. मुंबईच्या टीममध्ये दोन गट पडल्याच बोललं गेलं. यात रोहित शर्माच्या बाजूने काही खेळाडू होते, तर हार्दिक पांड्याच्या बाजूने काही उभे राहिले.
मुंबई इंडियन्स 17 मे रोजी शुक्रवारी IPL 2024 च्या सीजनमधील आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उतरली. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या मॅचआधी असं काही झालं, त्यामुळे MI चे फॅन्स दु:खी झाले. मॅच सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या एका प्लेयरने रोहित शर्माकडे त्याचा ऑटोग्राफ मागितला. या प्रसंगाने रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला सोडणार असल्याची चर्चा सुरु झालीय. मुंबईचे फॅन्स यामुळे निराश आहेत. रोहित शर्मासाठी मुंबई इंडियन्सचे फॅन्स खूप इमोशनल आहेत. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएलच विजेतेपद मिळवून दिलं.
बदल्यात फॅन्सनी त्याला भरपूर प्रेम आणि आदर दिला. हिटमॅनने फॅन्सच्या बरोबरीन आपल्या टीममधल्या सहकाऱ्यांकडून सुद्धा प्रेम आणि आदर कमावलय. आयपीएल 2024 मध्ये आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या रोमारियो शेफर्डने रोहितला एक छोटीसी बॅट दिली व त्यावर स्वाक्षरी करण्याची रोहितला विनंती केली. रोहितने लगेच त्या बॅटवर साइन केली.
मुंबई इंडियन्सचे फॅन्स खूप निराश
रोमारियो शेफर्ड वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आहे. T20 वर्ल्ड कप टीममध्ये त्याची सुद्धा निवड झालीय. त्याला रोहितकडे ऑटोग्राफ मागताना पाहून फॅन्सनी अंदाज वर्तवायला सुरुवात केली आहे. त्यांना असं वाटू लागलय की, त्यांच्या कॅप्टनचा मुंबई इंडियन्समध्ये हा शेवटचा सीजन आहे. तो या टीमसाठी शेवटचा सीजन खेळतोय. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स खूप निराश झालेत.
The end is near💔😭
— Abhishek (@be_mewadi) May 17, 2024
Rohit sharma’s last game at wankhede in blue jersey has MI… From 2025 he won’t be their in MI squad Or team…
— Shantanu💫 (@_shantanu12) May 17, 2024
त्या व्हिडिओवरुन मोठा वाद झाला
रोहित शर्माबद्दल संपूर्ण सीजनमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. अनेकवेळा हा दावा करण्यात आला की, मुंबई इंडियन्सची मॅनेजमेंट आणि त्याच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नाहीय. पुढच्या सीजनमध्ये रोहित दुसऱ्या कुठल्या फ्रेंचायजीकडून खेळताना दिसू शकतो. कोलकाता नाइट रायडर्सच्या व्हिडिओवरुन मोठा वाद झाला. हा व्हिडिओ शेअर करुन फॅन्स रोहित केकेआरमध्ये जाणार असल्याचा दावा करत होते. आता ऑटोग्राफमुळे पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरु झालीय.