CSK IPL 2023 Winner : CSK चॅम्पियन बनण्याच्या काहीतास आधीच मालकाला झाला तब्बल इतक्या कोटींचा फायदा
CSK IPL 2023 Winner : नफ्याच्या रक्कमेचा आकडा वाचून डोळे विस्फारतील. धोनीने CSK ला चॅम्पियन बनवण्याच्या काहीतास आधीच हे घडलं होतं. सीएसकेचे मालक कोण आहेत? त्यांना इतका नफा कसा झाला?
अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्सने IPL ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. सीएसकेने फायनलमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सला 5 विकेटने हरवलं. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 15 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. सीएसकेला विजयासाठी 171 धावांच टार्गेट मिळालं होतं. गुजरात टायटन्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 214 धावा केल्या. सीएसकेचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने शेवटच्या बॉलवर चौकार मारुन आपल्या टीमला पाचव विजेतेपद मिळवून दिलं.
आयपीएल इतिहासातील सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या CSK टीमला बक्षिसाच्या रक्कमेपोटी 20 कोटी रुपये मिळाले. महत्वाच म्हणजे सीएसकेने फायनलचा सामना जिंकण्याआधीच या टीमच्या मालकाला घसघशीत फायदा झाला होता.
CSK चे मालक कोण?
CSK च्या मालकाच नाव एन श्रीनिवासन आहे. इंडिया सिमेंट ही त्यांची कंपनी आहे. देशाच्या सिमेंट उद्योगात इंडिया सिमेंटच मोठ नाव आहे. देशातील 5 टॉप सिमेंट कंपनीपैकी इंडिया सिमेंट आहे. देशाच्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये इंडिया सिमेंटचा 5 ते 7 टक्के मार्केट हिस्सा आहे. एन श्रीनिवासन यांच क्रिकेटशी जुनं नात आहे. बीसीसीआय चीफ म्हणून त्यांनी काम केलं आहे. ते आयसीसीचे माजी चेयरमन सुद्धा होते. अनेक वादही त्यांच्याशी जोडले आहेत. वर्ष 2008 मध्ये त्यांनी CSK ची टीम विकत घेतली.
सोमवारी कंपनीच्या शेयर्समध्ये तेजी
सोमवारी एन श्रीनिवासन यांची कंपनी इंडिया सिमेंटच्या शेयर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. या कंपनीचा शेयर 193.20 रुपयावर बंद झाला. बाजार चालू असताना इंडिया सिमेंटचा शेयर 193.50 रुपयापर्यंतही पोहोचला होता. सिमेंटच्या शेयर्समध्ये तेजी असण्याचा आज दुसरा दिवस होता. शुक्रवारी कंपनीचा शेयर 187.85 रुपयावर बंद झाला होता. इंडिया सिमेंटच 52 आठवड्यातील हाय 298.45 रुपये आहे. 20 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या शेयर्समध्ये इतकी तेजी दिसली होती. मार्केट कॅपमुळे इतक्या कोटींचा फायदा
इंडिया सिमेंटच्या शेयर्समध्ये तेजी असल्याने कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुद्धा मोठी वाढ पहायला मिळाली. शुक्रवारी शेयर बाजार बंद झाला, तेव्हा कंपनीच मार्केट कॅप 5,821.41 कोटी रुपये होतं. सोमवारी शेयर बाजार बंद होताना कंपनीच मार्केट कॅप वाढून 5,987.21 कोटी रुपये झालं. म्हणजेच कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये एकाच दिवसात 166 कोटी रुपयांची वाढ झाली. म्हणजे सीएसके चॅम्पियन बनण्याआधी कंपनीच्या मालकाचा 166 कोटी रुपयांचा फायदा झाला.