ODI World Cup 2023 आधी 6,115 किमीच्या प्रवासात Team India ला बसले दोन झटके
ODI World Cup 2023 मध्ये टीम इंडिया येत्या 8 ऑक्टोबरपासून आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. त्याआधी टीम इंडियाला दोन झटके बसलेत.
मुंबई : वनडे वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट सुरु व्हायला आता फक्त एक दिवस उरला आहे. उद्या म्हणजे 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. टीम इंडियाच वर्ल्ड कपमधील अभियान येत्या 8 ऑक्टोबरपासून सुरु होईल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईत टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया एक मजबूत टीम आहे. नुकत्यात झालेल्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 2-1 ने विजय मिळवला. यात शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपच्या मुख्य सामन्यात खेळण्याआधी सराव आवश्यक होता. तयारीची चाचपणी करत आली असती. यासाठी टीम इंडियाच्या दोन वॉर्म-अप मॅच होत्या. पण या दोन्ही सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं. टीम इंडियाचा पहिला सामना गुवाहाटीमध्ये इंग्लंड विरुद्ध होता. दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे नेदरलँड्स विरुद्ध होता. हे दोन्ही सामने रद्द झाले. टीम इंडियासाठी हा एक प्रकारचा झटकाच आहे. भारतच या वर्ल्ड कपमध्ये अशी एकमेव टीम असेल, जी कुठल्याही प्रॅक्टिस मॅचशिवाय मैदानात उतरेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 27 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. राजकोटमध्ये हा सामना झाला. वनडे सीरीजची ही तिसरी मॅच होती. टीम इंडियाचा या मॅचमध्ये पराभव झाला. 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या 7 दिवसाच्या कालावधीत टीम इंडियाने 3 शहरांमध्ये मुक्काम केला. 6,115 किलोमीटरचा प्रवास केला. टीम इंडियाकडे यावेळी वर्ल्ड कप जिंकण्याची चांगली संधी आहे. 12 वर्षानंतर भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे. 2011 साली याआधी भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धा झाली होती. त्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली होती. फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला होता. टीम इंडियाने आतापर्यंत दोनवेळा वनडे वर्ल्ड कप जिंकलाय. पण मागच्या 10 वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
इतिहास रचण्याची संधी
2013 मध्ये टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाली होती. धोनी टीमचा कॅप्टन होता. आता रोहितकडे इतिहास रचण्याची संधी आहे. त्याने टीमला चॅम्पियन बनवलं, तर कपिल देव, एमएस धोनी यांच्यानंतर वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारा तिसरा भारतीय कॅप्टन असेल. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच स्क्वाड- रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, आर अश्विन, सिराज, शमी, बुमराह.