IND vs WI | प्रयोग सोडा, Rohit Sharma-Virat Kohli ला जास्त प्रॅक्टिसची गरज, आधीच 3 टीम्ससमोर पोलखोल

Rohit sharma-Virat Kohli | रोहित शर्मा-विराट कोहलीची मागच्या 2 ते 3 वर्षातील कामगिरी पोलखोल करतेय. खासकरुन तीन टीम्स भारताच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या मार्गात मोठा अडथळा आहेत. त्यांच्याविरोधातच रोहित-विराटची सुपर फ्लॉप कामगिरी आहे,

IND vs WI | प्रयोग सोडा, Rohit Sharma-Virat Kohli ला जास्त प्रॅक्टिसची गरज, आधीच 3 टीम्ससमोर पोलखोल
Robit Sharma-Virat KohliImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 12:37 PM

मुंबई : वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात भारतीय टीमने 5 विकेटने विजय मिळवला. टीमसमोर विजयासाठी 115 धावांच टार्गेट होतं. हे लक्ष्य फार मोठं नव्हतं. या मॅचमध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी काही प्रयोग केले. इतके प्रयोग होतील, याचा कोणी विचारच केला नव्हता. रोहित सातव्या नंबरवर बॅटिंगसाठी आला. विराट कोहलीला बॅटिंगची संधीच मिळाली नाही. हे प्रयोग फार यशस्वी ठरले नाहीत.

हे प्रयोग जरी केले असले, तरी एक प्रश्न निर्माण होतो. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीला जास्त सरावाची आवश्यकता नाहीय का?

दोघांच्या ग्राफमध्ये घसरण

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी मागच्या एक दशकात भारतीय क्रिकेटसाठी वनडे फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. दोघांनी मागच्या वर्ल्ड कपमध्ये भरपूर धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मागच्या चार वर्षात दोघांच्या ग्राफमध्ये घसरण झालीय. मात्र अजूनही ते टीमचे बेस्ट फलंदाज आहेत. टीमला मीडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी जास्त वेळ दिला जात असेल, तर कोणाला आक्षेप असण्याच काही कारण नाही. कारण वर्ल्ड कपपर्यंत सर्वांना सूर गवसण आवश्यक आहे.

वर्ल्ड कपमध्ये चॅलेंज देऊ शकणाऱ्या टीमसमोर सर्वात जास्त संघर्ष

रोहित आणि कोहलीने प्रत्येक मॅचमध्ये बॅटिंगची संधी साधली पाहिजे. स्वत:ला तयार केलं पाहिजे. यामागे कारणही तसच आहे. मागची 2-3 वर्ष या फलंदाजांसाठी चांगली राहिलेली नाहीत. त्यांना संघर्ष करावा लागलाय. खासकरुन त्या टीम विरोधात संघर्ष केलाय, जे वर्ल्ड कपमध्ये आव्हान देऊ शकतात.

कोहलीच्या 2 इनिंगमध्ये फक्त 33 धावा

मागच्यावर्षी इंग्लंड दौऱ्यावर 3 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये दोघे फ्लॉप होते. रोहितने 3 इनिंगमध्ये 93 धावा केल्या. यात एक अर्धशतक होतं. कोहलीने 2 इनिंगमध्ये फक्त 33 धावा केल्या. जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा फार काही चांगली स्थिती नव्हती. कोहलीने 3 डावात फक्त 55 धावा केल्या. रोहितने इतक्याच इनिंगमध्ये 186 धावा केल्या. यात एक शतक आणि अर्धशतक होतं.

रोहितच्या 2 इनिंगमध्ये 43 रन्स

टीम इंडिया आणि या दोघांची खरी परीक्षा मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाली. टीम इंडिया सीरीज हरली पण दोघेही सीनियर फलंदाज अपयशी ठरले. कोहलीने तीन इनिंगमध्ये फक्त 89 धावा केल्या. यात एक अर्धशतक आहे. रोहितने 2 इनिंगमध्ये 43 रन्स केले. वर्ल्ड कपमध्ये काहीही होऊ शकतं

वर्ल्ड कप जिंकण्याच्या भारताच्या मार्गात तीन टीम्स अडथळा निर्माण करु शकतात. या टीम्स विरोधात टीम इंडियाच्या दोन मोठ्या फलंदाजांची कामगिरी फार आश्वासक नाहीय. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरोधात दोघांनी खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण वर्ल्ड कपमध्ये काहीही होऊ शकतं. म्हणून आधी स्वत:ला तयार करण्याची एकही संधी सोडू नये.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.