VIDEO : इंग्लंडमध्ये सराव सामन्यापूर्वीच ‘विराट, रोहित’ भिडले ‘अश्विन, पुजाराशी,’ मैदानावर सरावादरम्यान आपआपसांत चुरस

भारत आणि इंग्लंडच्या काउंटी टीममध्ये आजपासून 3 दिवसांच्या सराव सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सांयकाळी 4 वाजता सुरु होईल.

VIDEO : इंग्लंडमध्ये सराव सामन्यापूर्वीच 'विराट, रोहित' भिडले 'अश्विन, पुजाराशी,' मैदानावर सरावादरम्यान आपआपसांत चुरस
भारतीय संघ सराव करताना
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 11:41 AM

डरहम : इंग्लंड (England) काउंटी टीम (County Team) आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यात आज सराव सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये आपआपसांतच मैदानावर सरावादरम्यान चुरशीचा सामना पाहायला मिळाला. संघातील खेळाडू दोेन गटात विखुरले गेले ज्यात एका गटात विराट (Virat) आणि रोहित (Rohit) तर दुसऱ्या गटात अश्विन (Ashwin) आणि पुजारा (Pujara) हे नेतृत्त्व करत होते. दोन्ही गटांनी एकमेंकाना टक्कर देत सराव केला. हा सराव भारतीय खेळाडूंच क्षेत्ररक्षण मजबूत करण्यासाठी घेण्यात आला होता. फील्डिंग कोच आर. श्रीधर (R. Sridhar) यांनी हा सराव घडवून आणला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात सर्व खेळाडू सरावादरम्यान या फील्डिंगच्या विशेष स्पर्धेत भाग घेत आहेत. फील्डिंग कोच आर. श्रीधर यांच्यामते फील्डिंगच्या या सरावामुळे खेळाडूंची फील्डींग प्रॅक्टीसतर होईलच पण सोबतच फिटनेसही चांगला राहिल.

विराट-रोहित पडले अश्विन-पुजारावर भारी

व्हिडीओमध्ये आर. श्रीधर या संपूर्ण सरावाबद्दल सांगतात. ते म्हणतात, ”संपूर्ण संघाला दोन गटात वाटण्यात आलं. एकात विराट, रोहित आणि दुसऱ्यात अश्विन, पुजारासारखे खेळाडू. या संपूर्ण सरावानंतर अखेर स्कोर बोर्ड पाहिला तर विराट-रोहित यांचा पगडा भारी होता. ते अश्विन- पुजाराच्या टीमपासून 10-8 ने पुढे होते.”

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

हे ही वाचा

India vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

(Before Practice match at durham team india is busy in Fun fielding game video Shared By BCCI)

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.