T 20 वर्ल्ड कप आधी India-Pakistan भिडणार, जाणून घ्या कुठल्यादिवशी होणार ही हाय वोल्टेज टक्कर

यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा (T 20 World cup) होणार आहे. या वर्ल्ड कप मध्ये सर्वात लक्षवेधी लढत ठरेल, ती भारत-पाकिस्तानची.

T 20 वर्ल्ड कप आधी India-Pakistan भिडणार, जाणून घ्या कुठल्यादिवशी होणार ही हाय वोल्टेज टक्कर
ind vs pakImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 12:25 PM

मुंबई:  यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा (T 20 World cup) होणार आहे. या वर्ल्ड कप मध्ये सर्वात लक्षवेधी लढत ठरेल, ती भारत-पाकिस्तानची.  मागच्यावर्षी 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताला (IND vs PAK) पराभूत केलं होतं. भारतीय संघाने त्या पराभवाचा वचपा काढावा, अशीच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशियातील हे दोन बलाढ्य संघ एका स्पर्धेत परस्परांना भिडणार आहेत. आशिया कप (Asia Cup) मध्ये ही लढत होईल. 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेची सुरुवात होणार आहे. 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान मध्ये लढत होईल. आशिया चषक टी 20 फॉर्मेट मध्ये खेळला जाणार आहे. टी 20 वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. भारत-पाकिस्तान संघ 2021 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदा आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने आमने-सामने येतील.

मागच्या पराभवाचा बदला घ्या

मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेटने भारताचा पराभव केला होता. आशिया कप नंतर वर्ल्डकप 2022 मध्येही दोन्ही संघांमध्ये सामना होईल. 23 ऑक्टोंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात ही मॅच होईल. म्हणजे दोन महिन्यात दोनदा क्रिकेट रसिकांना भारत-पाकिस्तान लढतीचा रोमांच अनुभवता येणार आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारताचा रेकॉर्ड कसा आहे?

आशिया चषक स्पर्धेत भारताचा शानदार रेकॉर्ड आहे. भारताने 6 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी भारताने शेवटचं 2018 मध्ये बांगलादेशला फायनल मध्ये नमवून आशियातील चॅम्पियन संघ बनण्याचा मान मिळवला होता. भारतानंतर श्रीलंकेने ही स्पर्धा 5 वेळा जिंकली आहे. पाकिस्तानच्या संघाला फक्त दोनदा आशिया चषक जिंकता आला आहे. पाकिस्तानने 2012 मध्ये शेवटची आशिया चषक स्पर्धा जिंकली होती.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.