IPL 2023 Mumbai Indians : ‘मी आताच या खेळाडूंवर….’ कॅप्टन Rohit Sharma च महत्वाच विधान
Mumbai Indians News : आयपीएलच्या 16 व्या सीजनला सुरुवात होण्याआधीच मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने महत्वाच विधान केलय. मुंबई इंडियन्स या लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे.
IPL 2023 Mumbai Indians News : मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईच्या टीमने आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपदाचा किताब मिळवला आहे. याच मुंबई इंडियन्स टीमची मागच्या सीजनमधील कामगिरी खूपच खराब होती. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम तळाला होती. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमकडून दमदार सुरुवाताची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पहिल्या सीजनला सुरुवात होण्याआधी कॅप्टन रोहित शर्माने आपले विचार व्यक्त केलेत.
लोकांच्या अपेक्षांमुळे त्रास होत नाही, असं रोहितने म्हटलय. मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत एक हाइप आहे. रोहितला युवा खेळाडूंना त्या हाइपपासून वाचवायच आहे.
टीमकडून असलेल्या अपेक्षांवर रोहित शर्माच मत
टीमकडून आयोजित पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा तुम्ही मैदानावर खेळायला उतरला, तेव्हा तुमच्याकडून अपेक्षा असतात. इतकी वर्ष खेळल्यामुळे मला आता त्याचा त्रास होत नाही” “लोकांना माझ्याकडून काय हवय? त्याची मला चिंता वाटत नाही. आम्हाला माहितीय, सर्वश्रेष्ठ कामगिरी करुन ट्रॉफी जिंकायची आहे. नेहमी त्याचाच विचार केल्याने तुमच्यावर तो दबाव येतो” असं रोहित म्हणाला.
कॅमरुन ग्रीन पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळणार
डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा आपला दुसरा आयपीएल सीजन खेळतील. ऑस्ट्रेलियाचा युवा ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीन पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळणार आहे. रोहित म्हणाला की, “मला आताच या युवा खेळाडूंवर दबाव टाकायचा नाहीय. आमची पहिली मॅच जवळ येईल, तेव्हा या खेळाडूंना विशिष्ट जबाबदारी दिली जाईल”
आयपीएल खेळताना मानसिकता कशी असावी?
रोहित शर्माने नव्या खेळाडूंना सल्ला दिला. “देशांतर्गत क्रिकेटचा विस्तार म्हणून आयपीएलच्या प्लॅटफॉर्मकडे पहाव. प्रथम श्रेणी आणि क्लब क्रिकेटमध्ये तुम्ही जे मिळवलय, तशीच कामगिरी इथे करण्याचा प्रयत्न करा. आयपीएल पूर्णपणे वेगळय हे मला माहित आहे. पण मी त्यांना त्याच मानसिकतेने उतरण्याचा सल्ला देईन” असं रोहितने सांगितलं. बुमराह नाही मग अपेक्षाकोणाकडून?
जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवणार हे रोहित शर्माने मान्य केलं. पण त्याची उणीव भरुन काढण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे जोफ्रा आर्चर आहे. तो 145 किमी प्रतिसात वेगाने बॉलिंग करु शकतो. रोहित शर्मा लवकरच बुमराहच्या पर्यायाची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.