U19 Final: विराटने अंडर 19 टीममध्ये जोश भरताच, इंग्लंडने रुट, मॉर्गन, बटलर या दिग्ग्जांची फौज उतरवली मैदानात
दोन दिवसांपूर्वी माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) फायनलमध्ये दाखल झालेल्या भारताच्या अंडर 19 टीमशी (India under 19 Team) संवाद साधला.
अँटिग्वा: दोन दिवसांपूर्वी माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) फायनलमध्ये दाखल झालेल्या भारताच्या अंडर 19 टीमशी (India under 19 Team) संवाद साधला. विराटने यावेळी यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा संघाला फायनलसाठी खास टिप्स दिल्या. विराटकडून अनुभवाचे चार शब्द ऐकायला मिळताच, भारताच्या युवा संघामध्ये जोश निर्माण झाला. या मुलांनी लगेच सोशल मीडियावर विराट सोबतच्या व्हर्च्युअल संवादाचे स्क्रिनग्रॅब शेअर केले. आता इंग्लंडनेही आपल्या युवा संघाला प्रेरीत करण्यासाठी दिग्गजांची फौजच मैदानात उतरवली आहे. इंग्लंडच्या अंडर 19 टीमचा कॅप्टन टॉम प्रेस्टने जो रुट, मॉर्गन, जोस बटलर, सॅम करण आणि साकिब महमूद सारख्या मोठ्या खेळाडूंनी मार्गदर्शन केल्याचं सांगितलं. फायनलआधी आपल्या टीमला या खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या, असे टॉम प्रेस्टने सांगितलं. विराटने 3 फेब्रुवारीला युवा खेळाडूंसोबत संवाद साधला होता. कोहलीशी बोलल्यानंतर सर्वच खेळडूंचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
फायनलआधी आम्ही उत्साहित आहोत. विराट कोहलीशी बोलून खूप बरं वाटलं. विराट सारख्या मोठ्या खेळाडूशी बोलून आमचं मनोधैर्य उंचावलं आहे. इंग्लंडचा कॅप्टन टॉम प्रेस्ट म्हणाला की, “रुट, मॉर्गन, बटलर सारखे मोठे क्रिकेटपटू आम्हाला खेळताना बघतायत, हे पाहून मला बरं वाटलं. आम्ही जे करतोय, त्यावर त्यांची नजर आहे”
??? ?????? ????? ?
Let’s get behind the #BoysInBlue as they take on England U19 today in the #U19CWC final. ?? ? #INDvENG pic.twitter.com/lJeHBEk2u1
— BCCI (@BCCI) February 5, 2022
आक्रमक क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला “आक्रमक क्रिकेट खेळण्यावर आमचा भर असेल. मॉर्गनने त्यासाठी आमच्या मनात विश्वास निर्माण केला. आम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मैदानावर उतरणार आहोत. आमचं सर्व लक्ष फक्त अंतिम सामन्यावर असेल” असं टॉम प्रेस्टने सांगितलं. मार्गन शिवाय माजी ऑफ स्पिनर ग्रॅम स्वानने सुद्धा संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. याआधी 1998 साली इंग्लंडच्या अंडर 19 टीमने वर्ल्डकप जिंकला होता. स्वान त्या संघाचा भाग होता. भारताला पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्डकपचं जेतेपद मिळवण्याची संधी आहे. भारत या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने 2022 अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्व सामने सहज जिंकले आहेत.
Before U 19 world cup final like virat Kohli England u 19 team confidnace boosted by root morgan & butler