IND vs ENG | भारत विरुद्ध इंग्लंड वॉर्म-अप मॅच रद्द होणार? गुवाहटीमधून समोर आली मोठी अपडेट
IND vs ENG | सामन्याआधीच क्रिकेट फॅन्ससाठी निराश करणारी बातमी. टीम इंडिया आज गुवाहटीमध्ये इंग्लंड विरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. पण त्याआधी एक मोठी अपडेट आहे.
गुवाहटी : पुढच्या आठवड्यापासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. त्याआधी भारत आणि इंग्लंडमध्ये आज 30 सप्टेंबरला पहिला सराव सामना होणार आहे. दोन्ही टीम्सचा हा पहिला आहे. इंग्लंड 5 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध आपला पहिला वर्ल्ड कप सामना खेळणार आहे. टीम इंडिया 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहे. वॉर्म-अप मॅचआधी गुवाहटीतून एक मोठी अपडेट समोर आलीय. त्यामुळे क्रिकेट फॅन्सच मन मोडलं जाऊ शकतं. भारत आणि इंग्लंडमधील सराव सामना गुवाहटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. पण आज गुवाहटीमध्य पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. weather.com च्या रिपोर्ट्नुसार, शनिवारी गुवाहटीमध्ये 50-55 टक्के पावसाची शक्यता आहे. दुपारी 2.00 वाजता सामना सुरु होईल.
वॉर्म-अप मॅचची लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
वॉर्म-अप मॅचची लाइव्ह स्ट्रीमिंग फ्री मध्ये डिज्नी+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) पाहता येईल.
वॉर्म-अप मॅचच लाइव्ह ब्रॉडकास्ट कुठे?
आयसीसी वर्ल्ड कप वॉर्म-अप मॅचच थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर होईल.
टीम इंडियाच्या वॉर्म-अप मॅचच शेड्युल कसं असेल?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 30 सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये इंग्लंड विरुद्ध पहिला सराव सामना खेळेल. त्यानंतर 3 ऑक्टोबरला नेदरलँड्स विरुद्ध दुसरा सराव सामना होईल. यजमान भारत मुख्य ड्रॉ मध्ये आपले 9 सामने वेगवेगळ्या स्थानावर खेळणार आहे.
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमच स्क्वॉड
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वर्ल्ड कपसाठी इंग्लिश टीमच स्क्वॉड
जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गस एटकिंसन, जानी बेयरस्टा, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स.