WTC Final पूर्वी भारतीय संघातील खेळाडूंमध्ये सराव सामना, ‘या’ खेळाडूने घेतले सर्वाधिक विकेट्स
भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडसोबत सराव सामना खेळत आहे. तर भारतीय संघातील खेळाडू एकमेंकाविरुद्ध सराव सामना खेळत आहेत.
साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. आयसीसी (ICC) क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड (India vs NewZealand) या दोन्ही संघात हा सामना होणार आहे. सध्या दोन्ही संघ सराव करत असून न्यूझीलंडचा संघ इंग्लंडसोबत सराव सामना खेळत आहे. तर भारतीय संघातील खेळाडू एकमेंकाविरुद्ध सराव सामना खेळत आहेत. (Before WTC Final Indian Players playing with other Ishant Took three wickets in practice match)
A good Day 1 at office for #TeamIndia at the intra-squad match simulation ahead of #WTC21 Final ? pic.twitter.com/TFb06126fr
— BCCI (@BCCI) June 12, 2021
पहिल्या दिवशी अखेर भारतीय संघात झालेल्या आपआपसातील सामन्यांत फलंदाजीत ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शुभमन गिलने (Shubhman Gill) उत्तम कामगिरी केली असून गिलने 135 चेंडूत 85 धावा केल्या आहेत. तर पंतने 94 चेंडूत धडाकेबाज 121 धावा ठोकल्या आहेत. गोलंदाजीचा विचार करता भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) 36 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या आहेत. बीसीसीआयने या सामन्यातील काही फोटो ट्विट केले आहेत.
It’s Day 2 of the intra-squad match simulation.
After @RealShubmanGill got a steady start with 85 off 135 deliveries, @RishabhPant17 found his groove with a 121* off 94 deliveries.@ImIshant leads the pack with 3/36 #TeamIndia pic.twitter.com/YRNsVjweDt
— BCCI (@BCCI) June 12, 2021
न्यूझीलंडही कमालीच्या फॉर्ममध्ये
न्यूझीलंडचा संघही इंग्लंडविरोधात उत्तम फॉर्ममध्ये असून कसोटी क्रिकेटमधील एक अनोखे रेकॉर्ड न्यूझीलंडच्या फलंदाजानी आपल्या नावे केले आहे. न्यूझीलंडच्या तीन फलंदाजानी पहिल्याच डावात 80 हून अधिक धावा करत एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. एकाच डावात संघाचे तीन फलंदाज 80 ते 89 च्या दरम्यान धावा करुन बाद होणे, हे टेस्ट क्रिकेटमध्ये सहाव्यांदा झाले आहे. मात्र एका डावात दूसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांच्या फलंदाजानी 80 ते 89 च्या दरम्यान धावा करत एक नवा रेकॉर्ड केला आहे. न्यूझीलंडच्या डेवन कॉनवे (Devon Conway) याने 12 चौकारांसह 80, विल यंगने (Will Young) 11 चौकारांसह 82 आणि रॉस टेलरने (Ross Taylor) 11 चौकारांच्या मदतीने 80 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा :
WTC Final पूर्वीच न्यूझीलंडची भारताला चेतावनी, इंग्लंड विरोधात अनोखा रेकॉर्ड केला नावावर
WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी