WTC फायनल मॅचपूर्वी सचिनचा विराटला महत्त्वाचा सल्ला तर पुजाराबाबत केलं ‘हे’ विधान, काय म्हणाला क्रिकेटचा देव?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) सामन्याला सुरुवात होण्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे. या जागतिक कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असणारे भारत (India) आणि न्यूझीलंड(NewZealand) हे संघ आमने-सामने असणार आहेत.

WTC फायनल मॅचपूर्वी सचिनचा विराटला महत्त्वाचा सल्ला तर पुजाराबाबत केलं 'हे' विधान, काय म्हणाला क्रिकेटचा देव?
Sachin Tendulkar
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 12:34 PM

मुंबई : बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीनला सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (NewZealand) हे दोन्ही संघ सामन्यासाठी तयार झाले असून दोन्ही संघाच्या खेळाडूंना क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज महत्त्वाचे सल्ले देत आहेत. क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील भारतीय संघाला महत्त्वाचे सल्ले दिले असून त्याने कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मोलाचा सल्ला दिला आहे. सोबतच फलंदाज चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत यांचीही स्तुती करत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. (Before WTC Final Sachin Tendulkar gave advice to Virat Kohli CheteShwar Pujara and Other Team India Players )

सचिन तेंडुलकरने आज तकच्या सलाम ए क्रिकेट या विशेष कार्यक्रमात दिलेल्या माहितीत विराटला WTC Final सामन्यात जपूण खेळत फ्रंट फुट डिफेन्सवर अधिक लक्ष द्यायला सांगितलं आहे. सचिनने दिलेल्या सल्ल्यानुसार अंतिम सामन्यात वापरला जाणारा ड्युक बॉल सुरवातीला स्लो जातो. त्यामुळे कर्णधार विराटने जपून खेळत सुरुवातीला डिफेन्स करणे गरजेचे आहे. असं सचिन म्हणाला. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला (Shubhman Gill) देखील सचिनने फ्रंट फुट डिफेन्स करण्याचा सल्ला दिला आहे.

इंग्लंडच्या वातावरणाचा अंदाज घेणं महत्त्वाचं

सचिनने फलंदाजाना सल्ला देताना सांगितले की, फलंदाजाना सुरुवातीला सांभाळून खेळणे गरजेचे आहे. कारण इंग्लंडच्या सध्याच्या वातावरणात बॉल धिम्यागतीने जातो. जास्त स्वींगदेखील होतो. त्यानंतर जस जसं ऊन वाढतं, खेळ बदलण्यास सुरुवात होते. त्यामुळे जेव्हा बॉल जास्च स्वींग होतो तेव्हा फलंदाजानी सांभाळून डिफेन्सीव खेळणे महत्त्वाचे आहे.

पंत आणि पुजाराचं कौतुक

सचिन तेंडुलकर फलंदाज चेतेश्वर पुजाराबद्दल विचारणा केल्यावर म्हणाला, ‘पुजारा एक अप्रतिम फलंदाज आहे. त्याने आपला खेळ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातच दाखवला होता. पुजाराच्या स्ट्राइक रेटचा विचार न करता त्याच्या कन्सिटन्सीकडे पाहण महत्त्वाच आहे.  5 दिवसांच्या सामन्यात त्याच्यासारख्य खेळाडूच महत्त्व अधिक असतं.’ तसंच पंतबद्दल सचिन म्हणाला, ‘ऋषभ पंत असा फलंदाज आहे, जो केवळ एका तासात सामना पलटवू शकतो. अनेकजण त्याच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्न उठवतात. पण तो महान फलंदाज गिलक्रिस्टप्रमाणे खेळतो.’

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

WTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते? सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(Before WTC Final Sachin Tendulkar gave advice to Virat Kohli CheteShwar Pujara and Other Team India Players)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.