Asia Cup 2023 फायनलआधी टीम इंडियाचा मोठा झटका, स्टार ऑलराऊंडरला दुखापत
IND vs SL | स्टार ऑलराऊंडरची जागा घेण्यासाठी कुठला खेळाडू रवाना झाला?. आशिया कप 2023 टुर्नामेंटमध्ये रविवारी टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये अंतिम सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला झटका बसला आहे.

कोलंबो : टीम इंडिया उद्या आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा सामना आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाच्या प्रमुख ऑलराऊंडर खेळाडूला दुखापत झाली आहे. शुक्रवारी सुपर 4 राऊंडमध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना बांग्लादेश विरुद्ध झाला. या मॅचमध्ये बांग्लादेशने टीम इंडियाला 6 धावांनी पराभूत केलं. हा सामना अटी-तटीचा झाला. टीम इंडियाच्या एका प्रमुख ऑलराऊंडरने यात महत्त्वाची भूमिका बजावली. कदाचित तो टिकला असता, तर कालचा सामना टीम इंडियाने जिंकला असता. पण दुर्देवाने तो बाद झाला. परिणामी टीम इंडियाचा पराभव झाला. आता फायनलआधी टीम इंडियाला झटका बसला आहे. टीम इंडियाने लगेच दुसऱ्या खेळाडूला बोलवून घेतलं आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलला दुखापत झाली आहे. काल बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात अक्षर खेळला.
अक्षर पटेलने 34 चेंडूत 42 धावा केल्या. यात 3 फोर आणि 2 सिक्स होते. त्याने 9 ओव्हरमध्ये 47 धावा देऊन एक विकेट घेतला. सामना अटी-तटीच्या स्थितीत असताना अक्षर बाद झाला. आता अक्षरला दुखापत झालीय. त्याच्याजागी शेवटच्या क्षणी वॉशिंग्टन सुंदरची टीममध्ये एन्ट्री झालीय. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर कोलंबोला रवाना झाला आहे. सुंदर अलीकडेच आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत गेला होता. तीन सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये तो दोन मॅच खेळला. दोन्ही सामन्यात त्याला एक विकेटही घेता आला नाही. सुंदरला आयपीएल 2023 दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो अनेक महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. दुखापत कितपत गंभीर?
अक्षरला बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात खेळताना दुखापत झाली. दुखापत कितपत गंभीर आहे, त्याची अजून कल्पना नाहीय. त्याच्या फायनलमध्ये खेळण्याबद्दल संशय आहे. बॅकअप म्हणून सुंदरला लगेच बोलवण्यात आलय. वॉशिंग्टन सुंदर एशियन गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय टीमचा भाग आहे. अक्षरला मैदानात दोन वेळा चेंडू लागला होता. अक्षर बॅटिंग करताना त्याला श्रीलंकन फिल्डरचा थ्रो लागला होता. फिजियोने मैदानात येऊन हातावर स्प्रे मारला होता.