Pakistan Super League : वेगवान चेंडू तोंडावर आदळा, विकेटकीपर जखमी, तोंडाला सात टाके

पाकिस्तानच्या सुपर लीगमध्ये एका ऑस्ट्रेलियन खेळाडूला जबर दुखापत झाली आहे. तोंडावर बॉल लागल्याने बेन डंक याच्या ओठाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे.

Pakistan Super League : वेगवान चेंडू तोंडावर आदळा, विकेटकीपर जखमी, तोंडाला सात टाके
बेन डंक
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 3:21 PM

कराची : पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2021) ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज बेन डंक (Ben Dunk) सरावादरम्यान गंभीर जखमी झाला आहे. सामन्याआधी सराव करताना चेंडू तोंडावर आदळल्याने बेनच्या ओठांना दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला सात टाके पडले असून काही काळ क्रिकेटपासूनही विश्रांती घ्यावी लागणार आहे. बेन पीएसएलमधील लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) संघाकडून खेळतो. (Ben Dunck Got Injured While Catchin Ball Practise gets stiches in Pakistan Super league)

पीएसएलला मार्चमध्येच सुरुवात झाली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पीएसएल स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरीत सामने 9 जूनपासून युएईत होणार आहेत. बेन खेळत लाहोर कलंदर्सचा संघही सध्या युएईत असून अबू धाबी येथे सराव करत आहे. या सरावादरम्यान बेन संघासोबत कॅच पकडण्याची प्रॅक्टीस करत होता. त्यावेळी चेंडूचा अंदाज न आल्याने चेंडू थेट बेनच्या तोंडावर आदळला. ज्यामुळे त्याच्या ओठाला जबर दुखापत झाली आणि सात टाके लावावे लागले. बेनच्या दुखापतग्रस्त होण्याने लाहोर कलंदर्स संघाला मोठा झटका बसला आहे.

बेनची प्रकृती स्थिर

लाहोर कलंदर्सचे सीईओ समीन राणा यांनी बेनची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. तसेच लवकरच बेन सामना खेळू शकेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सीजनमधील आतापर्यंतच्या सामन्यांत लाहोरच्या संघाकडून बेन डंकने प्रमुख कामगिरी निभावली होती.

कोण आहे बेन डंक?

बेन डंक हा एक 34 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज असून तो ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळतो. आतापर्यंत त्याने ऑस्ट्रेलियाकडून पाच टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 99 धावा केल्या आहेत. बेनने आजवर 157 टी-20 सामन्यांत 24.99 च्या सरासरीने 3 हजार 374 धावा केल्या आहेत. 18 अर्धशतक त्याच्या नावावर असून नाबाद 99 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

हे ही वाचा –

रोहित शर्माला घाबरला ‘हा’ पाकिस्‍तानी गोलंदाज, म्हणतो त्याच्यासारखे शॉट्स तोच खेळू शकतो

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!

WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…

(Ben Dunck Got Injured While Catchin Ball Practise gets stiches in Pakistan Super league)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.