मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील सिडनी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवारी) एक विचित्र घटना पाहायला मिळाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर (दुसऱ्या सत्रात) ही विचित्र घटना घडली. डावाच्या 30 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. चेंडू पॅडला लागल्याचा विचार करून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे अपील ऐकून अंपायर पॉल रायफल यांनीही बोट वर केले. (Ben Stokes Survives Despite Ball Hitting Stump; Shane Warne, Sachin Tendulkar React)
या निर्णयाविरोधात बेन स्टोक्सने लगेचच डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये जे दिसले ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. चेंडू बॅट किंवा पॅडला लागला नव्हता. खरे तर चेंडू स्टंम्पला लागला होता. मात्र बेल्स खाली पडल्या नाहीत, त्यामुळे स्टोक्स थोडक्यात बचावला.
ही विचित्र घटना पाहून दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर गोलंदाजांच्या समर्थनात मैदानात उतरला आहे. या घटनेबद्दल सचिन तेंडुलकर म्हणाला, ‘बॉल स्टम्पला लागल्यानंतरही बेल्स पडल्या नाहीत, यासाठी ‘हिटिंग द स्टंप्स’ हा नियम करायला हवा. तुम्हाला काय वाटते? गोलंदाजांच्या प्रति आपण निष्पक्ष असले पाहिजे.
Should a law be introduced called ‘hitting the stumps’ after the ball has hit them but not dislodged the bails? What do you think guys? Let’s be fair to bowlers! ???@shanewarne#AshesTestpic.twitter.com/gSH2atTGRe
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 7, 2022
सचिनचे ट्विट येताच दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नने याबाबत आपले मत व्यक्त केले. यावर चर्चेची गरज असल्याची प्रतिक्रिया वॉर्नने दिली. वॉर्नने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ही गोष्ट खूपच रंजक आहे आणि मित्रा, यावर वाद होऊ शकतो. मी ते जागतिक क्रिकेट समितीकडे चर्चेसाठी घेऊन जाईन आणि त्यानंतर तुला सांगेन. आज जे घडले तसे यापूर्वी कधीही पाहिले नाही. ग्रीनच्या चेंडूचा वेग 142 किमी प्रतितास इतका होता आणि तो खूप वेगाने स्टंपला लागला होता.
Interesting point & one to debate my friend. I will take this to the world cricket committee for discussion & come back to you. Never seen anything like that today – Greene’s delivery was 142kph and hit the stump hard !!!!! ?? https://t.co/GO6IeHgtsk
— Shane Warne (@ShaneWarne) January 7, 2022
शेन वॉर्नने फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करताना सांगितले की, मी अशी घटना कधीच पाहिली नव्हती. वॉर्न म्हणाला, अंपायरने काय म्हणून आऊट दिलं होतं? किती विचित्र गोष्ट होती ती. पॉल रायफल हा गोलंदाज होता आणि त्याने चेंडू स्टंपला लागताना पाहिला आणि म्हणाला, ‘यू आर आउट.’
वॉर्न म्हणाला, ही खूप विचित्र गोष्ट आहे, अशी घटना मी पहिल्यांदाच पाहिली, ज्यात मी पंचाना फलंदाजाला बाद घोषित करताना पाहिलं. कारण या घटनेत चेंडू स्टम्पला लागला मात्र बेल्स पडल्या नाहीत. मला माफ करा, मी अजूनही शॉकमध्ये आहे. मला अजूनही खात्री नाही की आम्ही नेमकं काय पाहिलंय.’
मालिकेतील पहिले तीन सामने गमावलेल्या इंग्लंड संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. यासोबतच हा सामना जिंकून इंग्लंडला मालिकेत व्हाईट वॉश देण्याचा कांगारुंचा प्रयत्न आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव आठ बाद 416 धावा करून घोषित केला होता. संघात पुनरागमन करणाऱ्या उस्मान ख्वाजाने नाबाद 137 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने 67 धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने पाच विकेट घेत शानदार कामगिरी केली. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव 294 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने शतकी (113) खेळी साकारली. त्याला बेन स्टोक्सने 66 धावांची खेळी करुन साथ दिली.
इतर बातम्या
IND vs SA: ‘तोंड नको, बॅट चालवं, नाही तर…’ ऋषभ पंतला सुनावलं
IND vs SA: पुजारा-रहाणेसाठी अय्यर-विहारीचा बळी देणार, राहुल द्रविडने दिले संकेत
Ajinkya Rahane: गौतम गंभीर यांचा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कुठला जुना राग आहे?
(Ben Stokes Survives Despite Ball Hitting Stump; Shane Warne, Sachin Tendulkar React)