WTC Final 2021 : भारतीय संघाच्या पराभवानंतर एक दिवसांनी रवी शास्त्रींचं ट्विट, महामुकाबल्यावर दिलं ‘ग्यान’!
सामना गमावल्यानंतर रवी शास्त्री काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर भारताच्या पराजयानंतर एक दिवसांनी रवी शास्त्री यांनी ट्विट केलं आहे. (Better team Won the Condition WTC Final 2021 Says Indian team Coach Ravi Shastri)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) न्यूझीलंडचा संघ भारताला सरस ठरला (India vs New Zealand) असं म्हटलं आहे. खराब फलंदाजीनंतर भारताला अंतिम सामन्यात आठ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. यासह, विराटसेना पुन्हा एकदा आयसीसीचं जेतेपद मिळविण्यापासून वंचित राहिली. कोहलीच्या नेतृत्वात भारताने कोणताही आयसीसी करंडक जिंकलेला नाही. कसोटी चँपियनशिप फायनलमध्ये भारतीय संघ दोन्ही डावांमध्ये केवळ 217 आणि 170 धावा करू शकला. त्याचवेळी न्यूझीलंडने पहिल्या धावांत लीड घेत आणि दुसऱ्या डावांत आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत केवळ तीन ते सव्वा तीन दिवसांत सामन्याचा निकाल लावला. (Better team Won the Condition WTC Final 2021 Says Indian team Coach Ravi Shastri)
रवी शास्त्री यांनी ग्यान वाटलं!
सामना गमावल्यानंतर रवी शास्त्री काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर भारताच्या पराजयानंतर एक दिवसांनी रवी शास्त्री यांनी ट्विट केलं आहे. परिस्थिती पाहता सर्वोत्तम टीम जिंकली. विश्व चॅम्पियन होण्यासाठी न्यूझीलंडने खूप काळ वाट पाहिली. मोठं यश लगोलग मिळत नाही, हे त्याचं एक उदाहरण आहे. किवींनी शानदार खेळ दाखवला. न्यूझीलंडसाठी सन्मान… असं ट्विट करत रवी शास्त्रींनी ग्यान वाटलं.
Better team won in the conditions. Deserved winners after the longest wait for a World Title. Classic example of Big things don’t come easy. Well played, New Zealand. Respect.
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) June 24, 2021
आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला
याअगोदर 2000 मध्ये न्यूझीलंडने त्यांचं शेवटचं आयसीसीचं एकमेव विजेतेपद जिंकले. त्यानंतर त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला पराभूत केले. न्यूझीलंडला 2015 आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. अशा वेळी किवींनी टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून आयसीसी ट्रॉफीचा फक्त दुष्काळच संपवला नाही तर दोन वर्षांपूर्वी अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची आठवण कायमची विस्मृतीत टाकण्याचा प्रयत्न केला.
पराभवानंतर विराट काय म्हणाला?
संपूर्ण क्रिकेट विश्वाला ज्या सामन्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलीय… आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 विकेट्स राखून पराभव केलाय. हा सामना म्हणावा असा रोमांचक झाला नाही… एकतर पहिल्यांदा पावसाने दोन दिवसांचा खेळ वाया गेला आणि नंतर भारतीय फलंदाजांकडून चमकदार कामगिरी बघायला मिळाली नाही. न्यूझीलंडने निर्विवाद वर्चस्व राखलं. परिणामी भारताला पराभवाची चव नाईलाजाने चाखावी लागली. सामना संपल्यानंतर याच गोष्टींना कर्णधार कोहलीने दोषी धरलं. पावसामुळे आम्हाला लय मिळणं मुश्किल झालं, त्यात बॅट्समनकडून म्हणावी अशी कामगिरी झाली नसल्याचं विराट म्हणाला.
(Better team Won the Condition WTC Final 2021 Says Indian team Coach Ravi Shastri)
हे ही वाचा :
WTC Final ची ट्रॉफी जिंकल्यानंतर केन विल्यमसनचं खास ठिकाणी फोटोशूट, आयसीसीने पोस्ट केले फोटो
WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली
WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!