IND vs PAK: भुवनेश्वर समोर टॉप क्लास बाबर आजम फेल, एकदा हा VIDEO बघाच

IND vs PAK: पाकिस्तानचा (Pakistan) कॅप्टन आणि क्रिकेट विश्वातील नंबर 1 फलंदाज आज भारतीय टीम समोर फ्लॉप ठरला. आशिया कप (Asia cup) मध्ये आज भारत-पाकिस्तान मध्ये महामुकाबला सुरु आहे.

IND vs PAK:  भुवनेश्वर समोर टॉप क्लास बाबर आजम फेल, एकदा हा VIDEO बघाच
babar-azam
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 9:51 PM

मुंबई: पाकिस्तानचा (Pakistan) कॅप्टन आणि क्रिकेट विश्वातील नंबर 1 फलंदाज आज भारतीय टीम समोर फ्लॉप ठरला. आशिया कप (Asia cup) मध्ये आज भारत-पाकिस्तान मध्ये महामुकाबला सुरु आहे. सर्व क्रिकेट जगताचं या सामन्याकडे लक्ष आहे. बाबर आजम (Babar Azam) फक्त 10 धावांवर बाद झाला. बाबरला भुवनेश्वर कुमारने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बाबर आजमने शानदार चौकारासह आपल्या डावाची सुरुवात केली. पण भुवनेश्वरच्या बाऊन्सरच बाबर आजमकडे कुठलही उत्तर नव्हतं. बाबरला आऊट करण्यासाठी भुवनेश्वरने जबरदस्त सेटअप केला होता. बाबर आजमला भुवीने आपल्या जाळ्यात कसं अडकवलं, ते जाणून घ्या.

भुवनेश्वरने बाऊन्सवर चकवलं

भुवनेश्वर कुमार आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पण दुबई मध्ये त्याला विशेष स्विंग मिळत नाहीय. त्याने आपल्या फुल लेंग्थ चेंडूंवर पाकिस्तानी फलंदाजांना चांगलच सतावलं. खासकरुन पाकिस्तानचा दुसरा सलामीवीर रिजवानला हैराण केलं. बाबर आजमला त्याने फुल चेंडू टाकला. दुसऱ्या ओव्हर मध्ये भुवीने बाबरला आपल्या बाऊन्सर चेंडूवर पूर्णपणे चकवलं.

बाबर आजम नंबर 1 फलंदाज

भुवनेश्वर कुमारने बाबर आजमला बाऊन्सर चेंडू टाकला. त्यावर पाकिस्तानी कॅप्टनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने बॅटच्या वरच्या बाजूची कड घेतली आणि अर्शदीप सिंहने एक सोपा झेल घेतला. बाबर आजमचा विकेट भारतासाठी खूप महत्त्वाचा होता. बाबर आजम जगातील नंबर एक टी 20 फलंदाज आहे. त्याची टी 20 मध्ये सरासरी 45 च्या आसपास आहे. भुवीने त्याचा विकेट काढून पाकिस्तानला मोठा झटका दिला.

फखर जमां सुद्धा लवकर बाद झाला

बाबर आजम नंतर पाकिस्तानला दुसरा झटकाही लवकर बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला फखर जमा 10 धावांवर आऊट झाला. फखरला वेगवान गोलंदाज आवेश खानने तंबुत पाठवलं. फखर जमांची कॅच विकेटकीपर दिनेश कार्तिकने घेतली. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने ऋषभ पंतला बसवून त्याच्याजागी दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.