भारताच्या भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा झटका? वसीम अक्रम काय म्हणाला

भारत पाकिस्तान सामने नेहमीच जगभरात मोठ्या उत्साहाने पाहिले जातात. पण यंदा चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चिंता वाढल्या आहेत.

भारताच्या भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा झटका? वसीम अक्रम काय म्हणाला
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 6:39 PM

T20 विश्वचषकानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मोठी स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पुढल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. यामध्ये आठ देश सहभागी होणार आहेत. पण यंदा या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला जाणार नकार दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याने म्हटले की, दुबई आणि श्रीलंकेत याचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी टीम इंडियाने आशिया चषकासाठी पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला होता. मैदान गमावण्याच्या भीतीने पाकिस्तानचे दिग्गज आता उघडपणे पुढे आले आहेत.

वसीम अक्रम काय म्हणाला

वसीम अक्रम एका मुलाखतीत म्हणाला की,“मला आशा आहे की भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येईल. आपला देश यजमानपदासाठी सज्ज आहे. आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करू. क्रिकेटही छान होईल. आमच्या इथे खूप चांगल्या सुविधा आहेत. नवीन स्टेडियमही बांधले जात आहेत. पीसीबी अध्यक्षांनी यासाठी कसरत सुरू केली आहे. कराची आणि इस्लामाबादच्या स्टेडियमला ​​नवीन रूप दिले जात आहे.

‘क्रिकेट आणि राजकारण वेगळे असावे’

वसीम अक्रम म्हणाला की, “क्रिकेटच्या सुधारणेसाठी पाकिस्तानला या स्पर्धेची गरज आहे. मला आशा आहे की जगभरातील संघ येथे सहभागी होतील. क्रिकेट आणि राजकारण वेगळे असले पाहिजे. पाकिस्तान या स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे.’

पुढील आठवड्यात निर्णय होऊ शकतो

बीसीसीआयने मागणी केली तर त्याचा नक्कीच आयसीसीकडून विचार होऊ शकतो. आयसीसीमध्ये बीसीसीआयचा मोठा दबदबा आहे. किस्तानमध्ये भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे बीसीसीआय ही जोखीम घेणार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जायचे की नाही याचा निर्णय बीसीसीआयच्या पुढील बैठकीत होणार आहे.

आठ संघ पात्र ठरले

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जे आठ संघ पात्र ठरले आहेत त्यामध्ये पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गद्दाफी स्टेडियम लाहोर, रावळपिंडी आणि नॅशनल स्टेडियम कराचीची निवड करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान याचे आयोजन केले जाऊ शकते असे सांगितले जात आहे. सुरुवात 19 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्याने होईल. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. पाकिस्तानसोबतचा ‘महामुकाबला’ 1 मार्चला होणार आहे.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.