RCB IPL 2021: भारताची डोकेदुखी वाढवणारा फिरकीपटू RCB च्या ताफ्यात, हेड कोचही बदलला
कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात मध्येच थांबवण्यात आलेली उर्वरीत आयपीएल युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सर्व संघ आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त असताना विराटच्या आरसीबी संघाने मोठे बदल केले आहेत.
मुंबई : बहुचर्चित अशा इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian premier league) 14 व्या सीजनचे उर्वरीत सामने 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाने मोठे बदल करत काही धाकड खेळाडूंना संघात समाविष्ट केलं आहे. मुख्य प्रशिक्षकही बदलला असून नुकतीच त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला ( Wanindu Hasaranga replaces Adam Zampa) घेण्यात आलं आहे. हसरंगा भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत मालिकावीर देखील राहिला होता.
? ANNOUNCEMENT ?
We’re thrilled to welcome Sri Lankan all-rounder Wanidu Hasaranga to the RCB Family for the second leg of #IPL 2021 in UAE. He replaces Adam Zampa. #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #NowAChallenger pic.twitter.com/nEf6mtRcNt
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 21, 2021
हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू यासह दुष्मंथा चमिरा यालादेखील आरसीबीने संघात घेतलं आहे. तो केन रिचर्डसनच्या बदली खेळणार आहे. तर टीम डेव्हिड हा फिन एलनला रिप्लेस करणार आहे.
? ANNOUNCEMENT ?
Dushmantha Chameera, Sri Lankan fast bowler, is ready to #PlayBold as he joins RCB for the UAE leg of #IPL 2021. Chameera replaces Daniel Sams. Welcome to the family, Chameera.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #NowAChallenger pic.twitter.com/BD0AGZeuE5
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 21, 2021
मुख्य प्रशिक्षकही बदलला
आरसीबी संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र आणखी चांगली कामगिरी करुन यंदा विजेतेपद पटकावण्यासाठी आरसीबी संघ हे सर्व बदल करत असून त्यांनी मुख्य प्रशिक्षकही बदलला आहे. दरम्यान मुख्य प्रशिक्षक बदलण्यामागे माजी प्रशिक्षक सिमॉन कॅटीच खाजगी कारणांमुळे स्पर्धेला येऊ शकत नसल्याने माईक हेसन (Mike Hesson) याला त्याच्याजागी घेण्यात आले आहे.
? ANNOUNCEMENT ?@CoachHesson takes over as head coach for the remainder of #IPL2021 after Simon Katich made himself unavailable due to personal reasons. #PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/MQ8ErjqMZI
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 21, 2021
इतर बातम्या
तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद
IPL 2021: UAE मध्ये मुंबई आणि चेन्नई संघाची धमाल, कोणी खेळतंय फुटबॉल तर कोणी वॉलीबॉल, पाहा VIDEO
VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’
(Big changes in RCB for IPL 2021 Wanindu Hasaranga replaces Adam Zampa Mike Hesson to be Head Coach)