IND vs NZ | मोठी बातमी, सेमीफायनल मॅचआधी रातोरात वानखेडेची खेळपट्टी बदलली का? BCCI वर मोठा आरोप
IND vs NZ Odi World Cup 2023 Semifinal Match | वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलआधी मोठी बातमी आहे. भारत-न्यूझीलंड सामन्याआधी पीचमध्ये बदल केल्याच वृत्त आहे. टीम इंडिया आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध मॅच खेळणार आहे.
मुंबई : वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडमध्ये ही मॅच होणार आहे. सेमीफायनल मॅचचा पहिला चेंडू टाकण्याआधीच वानखेडेचा पीचवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. वानखेडेचा पीच रातोरात बदलण्यात आलाय. भारतीय टीम मॅनेजमेंटच्या इशाऱ्यावरुन हे झालय असा रिपोर्ट आहे. बंगळुरुत नेदरलँड्स विरुद्ध सामना झाला. त्यानंतर टीम इंडियाकडून वानखेडेच्या पीच क्यूरेटरला स्लो ट्रॅक तयार करायला सांगण्यात आलं. द इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय. भारतीय मॅनेजमेंटने मुंबईच्या पीच क्यूरेटरला खेळपट्टीवरुन गवत हटवण्याची ताकीद दिली होती.
मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आलीय. मुंबईत दाखल होण्याआधीच भारतीय टीमने स्लो पीच बनवण्याच संदेश दिला होता. MCA शी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, खेळपट्टी स्लो हवी असा स्पष्ट संदेश होता. त्यामुळेच पीचवरुन आम्ही गवत हटवलं.
रातो-रात मुंबईची विकेट बदलली का?
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बहुतांश टीम असच करतात. ते आपल्या सोयीनुसार पीच तयार करायला लावतात. द्विपक्षीय मालिका असतातना बऱ्याचदा असं होतं. पण आता वर्ल्ड कपची मॅच आहे. वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचे आपले पीच क्युरेटर असतात. असं असताना भारतीय टीम मॅनेजमेंटच्या इशाऱ्यावरुन मुंबईच्या वानखेडे स्टेडियवरच्या पीचमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पीचवरुन गवत हटवून खेळपट्टी स्लो करण्यात आलीय. हे करणं कितपत योग्य आहे? आयसीसीला या बद्दल माहितीय का? हे सुद्धा महत्त्वाच आहे.
प्रॅक्टिस सेशन झाल्यानंतर टीम इंडियाने क्युरेटरला काय सांगितलं?
स्लो विकेटवर मॅच खेळवा, असा टीम इंडियाने वर्ल्ड कप सुरु होण्याआधी आग्रह केल्याचा वृत्त होतं. घरच्या मैदानात स्लो ट्रॅकवर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड सर्वप्रथम पीच पाहण्यासाठी पोहोचले होते. टीम इंडियाने प्रॅक्टिस सेशन झाल्यानंतर क्यूरेटरला एंटी ड्यू केमिकल फवारण्यास सांगितल्याचही वृत्त आहे.