Ranji Trophy: बिहारच्या 22 वर्षाच्या मुलाची डेब्यू मॅचमध्येच ट्रिपल सेंच्युरी, रचला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड

रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट स्पर्धेत बिहारच्या (Bihar) 22 वर्षाच्या मुलाने नवीन विक्रम रचला आहे. साकिबुल गानी (Sakibul Gani) असं या क्रिकेटपटूचं नाव आहे.

Ranji Trophy: बिहारच्या 22 वर्षाच्या मुलाची डेब्यू मॅचमध्येच ट्रिपल सेंच्युरी, रचला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड
sakibul gani
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 4:07 PM

नवी दिल्ली: रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट स्पर्धेत बिहारच्या (Bihar) 22 वर्षाच्या मुलाने नवीन विक्रम रचला आहे. साकिबुल गानी (Sakibul Gani) असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. त्याने आपल्या फर्स्ट क्लास क्रिकेट करीयरची शानदार सुरुवात केली आहे. बिहारच्या साकिबुलने जो कारनामा केलाय, तो आजपर्यंत दुसऱ्या कुठल्याही खेळाडूला जमलेला नाही. साकिबुलने इतिहास रचला आहे. रणजी ट्रॉफीच नाही, तर जगातील कुठल्याही फर्स्ट क्लास क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या क्रिकेटपटूला अशी कामगिरी करता आलेली नाही. फर्स्ट क्लासमध्ये त्रिशतकी खेळी अनेक क्रिकेटपटूंनी केली आहे. पण डेब्यु सामन्यातच त्रिशतक झळकवणारा बिहारचा साकिबुल पहिला फलंदाज आहे. साकिबुल गानी रणजी करंडक स्पर्धेत डेब्यु मॅचमध्येच सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. साकिबुलने 387 चेंडूमध्ये त्रिशतक झळकावल. यामध्ये त्याने 50 चौकार लगावले.

साकिबुल गानीच्या आधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यूमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मध्य प्रदेशच्या अजय रोहेरा याच्या नावावर होता. अजयने 2018-19 रणजी सीजनमध्ये हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हा कारनामा केला होता. अजय रोहेराने त्यावेळी 267 धावा केल्या होत्या. बिहारचा साकिबुल तो रेकॉर्ड मोडून खूप पुढे निघून गेला आहे.

रणजी डेब्युमध्ये साकिबुलचा वर्ल्ड रेकॉर्ड

मिजोरम विरुद्धच्या रणजी सामन्यात बिहारने फार चांगली सुरुवात केली नव्हती. 71 धावात त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर जे घडलं, त्याने इतिहास रचला. साकिबुल गानी आणि बाबुल कुमारने मिजोरमची गोलंदाजी अक्षरक्ष: फोडून काढली. साकिबुलने जबरदस्त त्रिशतकी खेळी केली व एक नवीन वर्ल्डरेकॉर्ड आपल्या नावावर केला.

वर्ल्ड रेकॉर्ड रचणाऱ्या साकिबुलने केल्या 341 धावा

साकिबुल गानीने एकूण 341 धावा केल्या. त्यासाठी त्याने 405 चेंडूंचा सामना केला. त्याने या खेळीत 56 चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याला बाबुल कुमारची साथ मिळाली. चौथ्या विकेटसाठी मिळून दोघांनी 756 चेंडूत 538 धावा केल्या.

bihar cricketer sakibul gani hit triple century on ranji trophy debut against mizoram

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.