IPL 2023 Qualifier 1 च्या मॅचआधी एमएस धोनीच्या CSK ला मोठा झटका
IPL 2023 Qualifier 1 : काल जिंकले, आज झटका. प्रमुख ऑलराऊंडर CSK च्या कॅम्पमधून बाहेर पडला. टीमचा प्रमुख ऑलराऊंडर या महत्वाच्या मॅचआधी राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मायदेशी रवाना झालाय.
चेन्नई : एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने काल प्लेऑफमध्ये प्रवेश केला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सवर 77 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह चेन्नईची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली. मंगळवारी चेन्नईचा गुजरात टायटन्स विरुद्ध क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरातची टीम 18 पॉइंट्ससह पहिल्या आणि चेन्नईची टीम 17 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
मंगळवारी होणाऱ्या क्वालिफायर 1 च्या सामन्याआधी एमएस धोनीच्या चेन्नई टीमला झटका बसला आहे. टीमचा प्रमुख ऑलराऊंडर या महत्वाच्या मॅचआधी राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी मायदेशी रवाना झालाय.
हा प्लेयर CSK च्या कॅम्पमधून का बाहेर पडला?
बेन स्टोक्स राष्ट्रीय कर्तव्यासाठी इंग्लंडला रवाना झालाय. तो इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. बेन स्टोक्स टीममध्ये नसणं, हा चेन्नई सुपर किंग्ससाठी एक झटका आहे. धोनीच्या टीमने गुजरात टायटन्सला नमवलं, तर ते थेट 16 व्या सीजनच्या फायनलमध्ये प्रवेश करतील.
मोठी रक्कम मोजून विकत घेतलेलं
बेन स्टोक्सला चेन्नईने आयपीएल 2023 ऑक्शनमध्ये मोठ्या किंमतीला विकत घेतलं होतं. चेन्नईने स्टोक्ससाठी तब्बल 16.25 कोटी रुपये मोजले होते. पण या खेळाडूचा CSK ला फार उपयोग झाला नाही. सीजन दरम्यान त्याला फार संधी मिळाली नाही.
View this post on Instagram
कोणा विरुद्ध टेस्ट मॅच
1 जूनपासून इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये एकमेव टेस्ट सामना खेळला जाणार आहे. इंग्लंड या टेस्टच्या निमित्ताने प्रतिष्ठेच्या Ashes टेस्ट सीरीजची तयारी करणार आहे. आयर्लंड विरुद्धच्या टेस्ट मॅचआधी बेन स्टोक्स इंग्लंडच्या स्क्वाडमध्ये दाखल होणार आहे. क्वालिफायर 1 चा सामना कुठे होणार?
स्टोक्सच्या अनुपस्थितीचा चेन्नई सुपर किंग्सला फार फरक पडणार नाही. मागच्या चार सामन्यात धोनीच एकच टीम घेऊन खेळला आहे. पुढच्या सामन्यातही तो फार बदल करेल, असं वाटत नाही. मंगळवारी 23 मे रोजी घरच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नईचा गुजरात टायटन्स विरुद्ध क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. स्टोक्सला फक्त 2 मॅचमध्ये संधी मिळाली. त्याने एकूण 15 धावा केल्या. त्याशिवाय 1 ओव्हर गोलंदाजी केली. त्यात त्याने 18 धावा दिल्या.