IND vs AUS : टीम इंडियात 10 वर्षानंतर पुनरागमन, फक्त 1 मॅचमध्ये मिळाली संधी, तिन्ही सामन्यात बसवलं बेंचवर
India vs Australia: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट सीरीजच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूच खेळणं कठीण दिसतय. हा खेळाडू पहिले तीन सामने सुद्धा बेंचवर बसून होता.
India vs Australia 4th Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु आहे. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने सीरीजमधील चौथा सामना जिंकल्यास, ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं करतील. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या एका खेळाडूच खेळणं कठीण दिसतय. या प्लेयरने 10 वर्षानंतर टीममध्ये पुनरागमन केलं होतं. पण त्याला सीरीजच्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचा पुन्हा प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे.
शानदार फॉर्ममध्ये असूनही स्थान मिळत नाहीय
31 वर्षाच्या जयदेव उनाडकटला या सीरीजच्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. बीसीसीआयने सीरीजच्या दुसऱ्या मॅचआधी जयदेव उनाडकटला टीममधून रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. तिसऱ्या कसोटीआधी पुन्हा त्याचा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला. जयदेव उनाडकट शानदार फॉर्ममध्ये आहे. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळत नाहीय.
बांग्लादेश दौऱ्यावर संधी
जयदेव उनाडकटला बांग्लादेश दौऱ्यावर टेस्ट टीममध्ये स्थान मिळालं होतं. या सीरीजमध्ये त्याला एक मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. तो 10 वर्षानंतर भारतीय टीमसाठी पुन्हा कसोटी सामना खेळला. बांग्लादेश विरुद्ध सीरीजच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 50 धावा देऊन 2 विकेट काढल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने एक विकेट काढली. या मॅचनंतर त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळालेली नाही. याआधी वर्ष 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये तो टीम इंडियासाठी कसोटी सामना खेळला होता. प्लेइंग 11 मध्ये फक्त 2 गोलंदाजांना संधी
बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये कॅप्टन रोहित शर्माने आतापर्यंत प्लेइंग 11 मध्ये फक्त 2 वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. सीरीजच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला संधी मिळाली. या दोघांनी आतापर्यंत सीरीजमध्ये शानदार प्रदर्शन केलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला आराम देण्यात आला. त्याच्याजागी उमेश यादवला संधी मिळाली. उमेश यादवने सुद्धा आपल्या परफॉर्मन्सने लक्ष वेधून घेतलं. अशा स्थितीत जयदेव उनाडकटला शेवटच्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी दिसतेय.